Premium Phone : सर्वसामान्यांमध्ये महागडे फोन घेण्याची क्रेझ, १ लाखाहून अधिक किंमतीच्या फोनच्या मागणीत 100% वाढ

फोन घेण्यासाठी आता बाजारात इएमआयच्या ऑफर्ससुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
Premium SmartPhone Sale
Premium SmartPhone Saleesakal
Updated on

Lack Of Water : अॅप्पल आणि सॅमसंगने बाजारपेठेत अॅडवांस फिचरचे स्मार्टफोन आणत त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ज्यामुळे वर्षभरात ₹1 लाखापेक्षा जास्त किंमतीच्या स्मार्टफोनची मागणी 100% पर्यंत वाढली आहे, ज्यामुळे चीनी प्रतिस्पर्धी Oppo, OnePlus आणि Tecno यांना फ्लॅगशिप अल्ट्रा-प्रिमियम हँडसेट लॉन्च करण्यास भाग पाडले.

काही ब्रँड्स आणि रिटेलर्सनेसुद्धा सांगितले की, श्रीमंत वर्गासह सर्वसामान्य लोकसुद्धा फ्लिप किंवा फोल्ड सारख्या नवीन फॉर्म घटकांसह, तसेच कॅमेरा, प्रोसेसर आणि मेमरीमधील उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह अॅडवांस डिव्हायसेसची निवड करत आहेत. अशाप्रकारचे फोन घेण्यासाठी आता बाजारात इएमआयच्या ऑफर्ससुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ज्यामुळे हे स्मार्टफोन्स विकत घेण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसून येतोय.

रिटेलर्सने असे देखील सांगितले की ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करणे त्यांनासुद्धा शक्य होत नसून अगदी सुरुवातीच्या अनेक प्री-बुकिंगची मागणीसुद्धा अजून पूर्ण झाली नाहीये.

अॅप्पलच्या स्ट्रिक्ट मीडिया पॉलिसीमुळे एका अग्रगण्य रिटेल ग्रुपने त्यांचे नाव पुढे जाहीर न करता असे सांगितले आहे की, त्यांच्याकडे iPhone 15 Pro मालिकेचे काही शंभर प्री-बुकिंगची डिलीव्हरी अजूनही बाकी आहे. पण डिलिव्हरी न झाल्यामुळे ऑर्डर कॅन्सलेशनचे प्रमाण फार कमी आहे.

Premium SmartPhone Sale
Premium SmartPhone Sale

प्रो सीरिजसाठी कंपनीच्या मालकीच्या वेबस्टोअरमध्ये तीन ते चार आठवड्यांच्या प्रतिक्षेचा कालावधी देण्यात आलाय.

उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका सहकाऱ्याने असे देखील सांगितले आहे की, अॅप्पलच्या नवीन आयफोन 15 मालिकेच्या आतापर्यंतच्या एकूण विक्रीमध्ये प्रो सीरीजचे योगदान गेल्या वर्षीच्या आयफोन 14 मालिकेच्या तुलनेत विक्रमी 30% जास्त आहे.

सॅमसंगच्या नवीन फ्लिप 5 आणि फोल्ड 5 ची किंमत 1,84,999 रुपये आहे. मागील वर्षीच्या स्मार्टफोन जनरेशनसाठी 1,000,00 प्री-बुकींग होत्या तर यंदा त्यात विक्रमी वाढ झाली असून युनिट्सची प्री-बुकिंग 1,50,000 होती. ऑगस्टच्या मध्यापासून या उपकरणांच्या विक्रीला सुरुवात झाली.

अॅप्पल आणि सॅमसंगला पाठवलेले ईमेल आतापर्यंत अनुत्तरित असल्याचे सांगण्यात येतेय.

Premium SmartPhone Sale
Amazon Premium Electronics Days : Amazon चा बंपर सेल, Apple स्मार्टवॉचवर मोठी सूट

अल्ट्रा-प्रिमियम हँडसेट्समध्ये वाढ

"अ‍ॅप्पल आणि सॅमसंगच नाही तर Oppo आणि Tecno सारख्या ब्रँडनेही यात प्रवेश केल्यामुळे, आता ग्राहक अल्ट्रा-प्रिमियम स्मार्टफोन्सच्या निवडीसाठी फारच उत्साही आहेत," असे साउथच्या एका मोठी रिटेल चैन असलेले मालक चंदू रेड्डी म्हणाले त्यांचे एकूण 800 स्टोअर्स आहेत.

सहज फायनान्स उपलब्ध असल्यामुळे फक्त श्रीमंतच नाही तर सर्वसामान्यांमध्येही आता महागड्या स्मार्टफोन्सची खरेदी वाढली आहे. मंगळवारी वनप्लसचे संस्थापक पीट लाऊ यांनी एका नोटमध्ये सांगितले की, त्यांचा ब्रँड लवकरच आपला पहिला फोल्डेबल फोन लॉन्च करेल. याची किंमत एक लाखाहून अधिक असेल अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. (Technology)

Premium SmartPhone Sale
iPhone 15 Pro : ग्राहकांच्या तक्रारी! फोन गरम होण्याबाबत Apple ने दिलं स्पष्टीकरण

काउंटरपॉइंट टेक्नॉलॉजी मार्केट रिसर्चचे संचालक तरुण पाठक म्हणाले की, अल्ट्रा-प्रिमियम हँडसेटची विक्री विक्रमी उच्चांक गाठेल, कारण याची निर्मिती गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.4 पट वेगाने वाढत आहे. "यामुळे भारतातील स्मार्टफोनची सरासरी विक्री किंमत गेल्या वर्षीच्या 20,000 रुपयांवरून सुमारे 22,000 रुपये होण्याची शक्यता आहे."

सॅमसंग इंडियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी जेबी पार्क यांनी अलीकडेच सांगितले की Galaxy Z Flip5 आणि Galaxy Z Fold5 चे यश हे दर्शवते की भारतीय ग्राहक नवीन अपडेट्सकडे कौतुकाने बघत बदल स्वीकारताना दिसताय.

लेटेस्ट ताज्या काउंटरपॉईंट अहवालानुसार, एप्रिल-जूनमध्ये प्रीमियम स्मार्टफोन्स जे 30,000-पेक्षा जास्त किंमतीचे होते त्यांची विक्री 112% वाढली तर प्रीमियम स्मार्टफोनचे योगदान यात 17% वर गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()