टेक्नोहंट : चेहराच तुमचा ‘आधार’!

कोणतीही शासकीय योजना असो, शाळा- महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असो, किंवा कुठेही ओळखीचा पुरावा द्यायचा असो; आधार कार्ड आवश्यकच असतं.
Aadhar Card
Aadhar CardSakal
Updated on
Summary

कोणतीही शासकीय योजना असो, शाळा- महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असो, किंवा कुठेही ओळखीचा पुरावा द्यायचा असो; आधार कार्ड आवश्यकच असतं.

कोणतीही शासकीय योजना असो, शाळा- महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असो, किंवा कुठेही ओळखीचा पुरावा द्यायचा असो; आधार कार्ड आवश्यकच असतं. त्यासाठी प्रत्येकवेळी तुम्हाला आधार कार्ड किंवा त्याची छायांकितप्रत सोबत बाळगावी लागते; मात्र आता आधार कार्ड सोबत बाळगण्याची कोणतीही आवश्यकता नाही. कारण आता युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ‘यूआयडीएआय’ने ‘आधार फेसआरडी’ अ‍ॅप लॉन्च केलं आहे.

सरकारची आधार प्रणाली योजना आज देशभरात फायदेशीर ठरली आहे. पूर्वी कोणत्याही शासकीय योजनेसाठी, शाळा-महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा देशभरात कोणत्याही ठिकाणी ओळखपत्र म्हणून आपल्याला अनेक कागदपत्रे सोबत बाळगावी लागत होती. मात्र २००९मध्ये आधार प्रणालीचा शुभारंभ झाला आणि देशभरातील नागरिकांना १२ अंकी ओळख क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे, गैरप्रकार होऊ नये म्हणून आधार नोंदणीवेळी संबंधित व्यक्तीच्या हाताच्या बोटांचे ठसे, डोळ्यातील रेटिना, तसेच चेहरेपट्टी स्कॅन करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख ठेवण्यास मदत झाली.

पुढे गरजेनुसार, आधारप्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली. ई-आधारमुळे तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर कोणतेही काम चुटकीसरशी व्हायला लागले. त्यामुळे आधार कार्डही सोबत बाळगण्याची गरज राहिली नाही; मात्र वेळेवर तुम्हाला आधार क्रमांक आठवला नाही तर? आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण ‘यूआयडीएआय’ने ‘आधार फेसआरडी’ अ‍ॅप लॉन्च केले आहे. या अ‍ॅपद्वारे तुमचा चेहरा स्कॅन करून अनेक कामे आता अवघ्या काही सेकंदात करता येणार आहेत.

‘फेस रेकग्निशन’चा वापर

1) आधार प्रणालीने लॉन्च केलेल्या ‘आधार फेसआरडी’ अ‍ॅप हे अनेक अर्थांनी फायदेशीर ठरणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा फोटो काढून तो स्कॅन केला जाईल. त्यानंतर आधार प्रणालीकडे नोंद असलेल्या तुमच्या माहितीशी पडताळणी केली जाईल. यासाठी आधार प्रणालीने फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

2) ‘आधार फेसआयडी’ अ‍ॅप अनेक ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना किंवा नावनोंदणी करताना वेळेवर आधार कार्ड सोबत नसल्यास किंवा आधार क्रमांक न आठवल्यास या अ‍ॅपच्या माध्यमातून तुमचे काम पूर्ण करता येणार आहे.

3) गुगल प्लेस्टोअरवरून हे अ‍ॅप डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर निश्चित प्रक्रिया पूर्ण करावी. ‘Proceed’ पर्यायावर क्लिक केल्यावर कॅमेरा सुरू होऊन तुमचा फोटो काढावा. तो स्कॅन करून त्याची आधार प्रणालीशी पडताळणी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.