टेक्नोहंट : शानदार, दमदार आणि दर्जेदार

आपल्यापैकी सर्वांनाच ॲपलच्या प्रत्येक गॅजेटबद्दल कुतूहल असते. दरवर्षी ॲपलकडून कोणते नवनवे गॅजेट्स सादर केले जातात, त्याबाबत आपण सर्वजण उत्सुक असतो.
Apple I-Phone 13
Apple I-Phone 13Sakal
Updated on
Summary

आपल्यापैकी सर्वांनाच ॲपलच्या प्रत्येक गॅजेटबद्दल कुतूहल असते. दरवर्षी ॲपलकडून कोणते नवनवे गॅजेट्स सादर केले जातात, त्याबाबत आपण सर्वजण उत्सुक असतो.

आपल्यापैकी सर्वांनाच ॲपलच्या प्रत्येक गॅजेटबद्दल कुतूहल असते. दरवर्षी ॲपलकडून कोणते नवनवे गॅजेट्स सादर केले जातात, त्याबाबत आपण सर्वजण उत्सुक असतो. म्हणूनच ॲपलने काल रात्री आयफोन 13 नव्या रंगाढंगात लॉन्च केला. याशिवाय आयफोन एसई 5जी, आयपॅड एअर, मॅक स्टुडियो डिस्प्ले असे एकाहून एक गॅजेट्स सादर केली.

आयफोन 13 व आयफोन 13 प्रो

गेल्या वर्षी सादर झालेल्या ‘आयफोन 13’ मालिकेतील सर्व चारही मोबाईल पाच वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध झाले होते. त्यापैकी ‘आयफोन 13’, ‘आयफोन 13 मिनी’ हे गुलाबी, निळा, मिडनाईट, स्टारलाईट आणि लाल रंगात; तर ‘आयफोन 13 प्रो’ आणि ‘आयफोन 13 प्रो मॅक्स’ हे ग्राफाईट, गोल्ड, सिल्व्हर आणि सिएरा ब्ल्यू रंगात दाखल झाले होचे. आता आयफोन 13 आणि आयफोन 13 प्रो हे दोन प्रीमियम स्मार्टफोन अनुक्रमे ग्रीन आणि अल्पाईन ग्रीन रंगात सादर झाले. दरम्यान, इतर फीचर्स हे पूर्वीप्रमाणेच आहेत. किमान 128 जीबी स्टोरेज, A15 Bionic प्रोसेसर देण्यात आले. ‘आयफोन 13’मध्ये ड्युअल कॅमेऱ्यासह वाईड आणि अल्ट्रा वाईड; तर ‘आयफोन 13 प्रो’मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसह वाईड, अल्ट्रावाईड आणि टेलिफोटो फीचर्स दिले आहेत.

आयफोन एसई 5जी

ॲपलने यापूर्वी सादर केलेल्या आयफोन एसई 2020 च्या तुलनेत बरेच साधर्म्य असलेला मात्र काही नवे फीचर्स देत आयफोन एसई 5जी हा बजेट प्रीमियम स्मार्टफोन सादर केला. जवळपास 4.7'''' Retina HD Display असलेल्या या स्मार्टफोनमध्ये आयफोन 13 मालिकेतील स्मार्टफोनप्रमाणे दोन्ही बाजूला प्रोटेक्टिव्ह ग्लास कव्हर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे 5जी नेटवर्क आणि A15 Bionic chip प्रोसेसर. ॲपलच्या आतापर्यंतच्या एकंदरीत प्रोसेसरपैकी A15 Bionic chip सर्वाधिक वेगवान प्रोसेसर समजल्या जाते,तसेच यामध्ये आयओएस 15 ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे.

आयपॅड एअर

आयफोनप्रमाणेच आयपॅडमध्येही नवं काय फीचर्स देण्यात आलंय, याबाबकत अनेकांना उत्सुकता असते. नव्याने सादर झालेल्या आयपॅड एअरमध्ये 10.9'''' Liquid Retina Display हा 500 नीट्स ब्राईटनेससह देण्यात आला आहे. अत्याधुनिक M1 chip सह आयपॅडमध्ये 8-core CPU, an 8-core GPU and the 16-core Neural Engine असल्यामुळे परफॉर्मन्स जबरदस्त ठरतो. त्यामुळे 4K व्हिडिओ एडिटिंग, हायलेव्हल ग्राफिकल गेमिंगचा चांगला अनुभव मिळतो.12MP वाईड ॲन्गल बॅक कॅमेऱ्याच्या मदतीने चक्क 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील करता येते. तसेच 12MPचा अल्ट्रा वाईड फ्रंट कॅमेरा व्हिडिो कॉल्सवेळी अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी आपोआप पॅन होतो. आयपॅड एअरमध्ये iPadOS 15 ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.