टेक्नोहंट : बजेट स्मार्टफोनचा उत्तम पर्याय

तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्ही एखाद्या चांगल्या फाईव्ह जी स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर सॅमसंगने तुमच्यासाठी किफायतशीर दरात उत्तम स्मार्टफोन लॉन्च केलाय, तो म्हणजे सॅमसंग गॅलक्सी M१४ ५G.
Smart Phone
Smart PhoneSakal
Updated on
Summary

तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्ही एखाद्या चांगल्या फाईव्ह जी स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर सॅमसंगने तुमच्यासाठी किफायतशीर दरात उत्तम स्मार्टफोन लॉन्च केलाय, तो म्हणजे सॅमसंग गॅलक्सी M१४ ५G.

तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्ही एखाद्या चांगल्या फाईव्ह जी स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर सॅमसंगने तुमच्यासाठी किफायतशीर दरात उत्तम स्मार्टफोन लॉन्च केलाय, तो म्हणजे सॅमसंग गॅलक्सी M१४ ५G. तब्बल ६००० एमएएच बॅटरी, ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि किंमत फक्त १५ हजार रुपये. एवढ्या माफक दरात मिळणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये कोणकोणते फीचर्स देण्यात आले आहे, त्याबाबत...

१. डिस्प्ले आणि डिझाईन

गॅलेक्सी M१४ या स्मार्टफोनमध्ये ९० Hz आयपीएस एलसीडी पॅनेलसह फुल एचडी प्लस ६.६ इंची डिस्प्ले दिला आहे. त्यामुळे या या स्मार्टफोनवर व्हिडिओ स्ट्रीमिंग करताना पैसा वसूल अनुभव येतो. हा स्मार्टफोन वजनाने हलका तर आहेच, शिवाय बजेटच्या तुलनेत आकर्षक डिझाईन आणि गोरीला ग्लास ५ च्या अद्ययावत संरक्षणामुळे हा स्मार्टफोन नक्कीच परवडणारा आहे.

२. परफॉर्मन्स आणि स्टोरेज

मल्टिटास्किंग आणि वेगवान परफॉर्मन्ससाठी गॅलेक्सी M१४ मध्ये ५nm एक्सिनोस १३३० ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला असून, तो ॲण्ड्रॉईड १३ ने सुसज्ज आहे. हाय लेव्हल गेमिंगच्या दृष्टिकोनातून हा प्रोसेसर फार चांगला नसला, तरी इतर सर्व कामांसाठी उत्तमच म्हणावा लागेल. स्टोरेजच्या बाबतीत बोलायचे झाल्यास गॅलेक्सी M१४ हा स्मार्टफोन ४ जीबी आणि ६ जीबी रॅम; तसेच १२८ जीबी स्टोरेज अशा दोन पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध झाला आहे. तसेच या स्मार्टफोनमधील स्टोरेज १ टीबीपर्यंत एक्सटेंड करता येते.

३. कॅमेरा आणि फोटोग्राफी

कोणत्याही स्मार्टफोनमधील महत्त्वाचे फीचर म्हणजे त्यातील कॅमेरा. स्मार्टफोन खरेदी करता बहुतांश ग्राहक कॅमेरा फीचर्सबाबत अधिक लक्ष देतो, त्यामुळे बजेटच्या तुलनेत सॅमसंगने या स्मार्टफोनमध्ये अद्ययावत ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. गॅलेक्सी M१४ मध्ये ५० मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह दोन मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा, दोन मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. परंतु हल्लीचा काळ बघता आणि बजेटच्या तुलनेत दोन मेगापिक्सलऐवजी किमान आठ किंवा १२ मेगापिक्सलचा तरी कॅमेरा द्यायला हरकत नव्हते.

४. बॅटरी आणि सुरक्षा

दीर्घकाळ बॅटरीलाईफ मिळण्याच्या हेतूने गॅलेक्सी M१४ ॲडाप्टिव्ह पॉवर सेव्हिंग मोडसह तब्बल ६०००mAh बॅटरी देण्यात आली आहे. हे या स्मार्टफोनमधील सर्वांत महत्त्वाचे फीचर आहे. तसेच २५W चे वेगवान चार्जिंग सपोर्ट दिला आहे. त्याशिवाय सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये नॉक्स सिक्युरिटी सुटमुळे ग्राहकांना जवळपास चार वर्षे सिक्युरिटी अपडेट्स दिले जाणार आहे.

५. अन्य वैशिष्ट्ये

डिस्प्ले - ६.६ इंच FHD+ ९०Hz Display

प्रोसेसर - ५nm Exynos १३३० Chipset

रॅम - ४ जीबी, ६ जीबी

स्टोरेज - १२८ जीबी

रिअर कॅमेरा - ५० एमपी + २ एमपी + २ एमपी

फ्रंट कॅमेरा - १३ एमपी

बॅटरी - ६००० mAh (२५W)

ऑपरेटिंग सिस्टिम - ॲण्ड्रॉईड १३

रंग - बेरी ब्ल्यू, स्मोकी टील आणि आयसी सिल्व्हर

किंमत - ४ जीबी +१२८ जीबी : १३,४९०, ६ जीबी +१२८ जीबी : १४,९९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.