टेक्नोहंट : तुमचाही व्हॉट्सअ‍ॅप डेटा लीक झालाय?

जगातील सर्वाधिक वापरल्या जाणारे समाजमाध्यम म्हणून व्हॉट्सअ‍ॅप हे गेल्या आठवड्याभरापासून बरेच चर्चेत आहे. विशेष म्हणजे, या वेळी त्यास कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.
Whatsapp Data
Whatsapp DataSakal
Updated on
Summary

जगातील सर्वाधिक वापरल्या जाणारे समाजमाध्यम म्हणून व्हॉट्सअ‍ॅप हे गेल्या आठवड्याभरापासून बरेच चर्चेत आहे. विशेष म्हणजे, या वेळी त्यास कारणही तितकेच महत्त्वाचे आहे.

जगातील सर्वाधिक वापरल्या जाणारे समाजमाध्यम म्हणून व्हॉट्सअ‍ॅप हे गेल्या आठवड्याभरापासून बरेच चर्चेत आहे. विशेष म्हणजे, या वेळी त्यास कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. एकीकडे व्हॉट्सअ‍ॅपचे नवनवे फीचर्स येत असताना जवळपास ५० कोटी यूजर्सचा डेटा लिक झाल्याचे वृत्त पुढे आले. व्हॉट्सअ‍ॅपने मात्र डेटा लिकचे खंडन केले असले, तरी खबरदारी म्हणून आपण काळजी घेऊ शकतो.

सुरुवातीला केवळ संदेश पाठवण्यापुरते मर्यादित असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये टप्प्याटप्प्याने नवनवीन फीचर्स आले आणि आपले अनेक कामे सोप्पी झाली. त्यामुळेच जगातील सर्वाधिक वापरले जाणारे समाजमाध्यम म्हणून व्हॉट्सअ‍ॅपकडे पाहिले जाते. दर महिन्याला जवळपास २०० कोटी यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. नवनवीन यूजरफ्रेण्डली फीचर्समुळे अनेक कामे व्हॉट्सअ‍ॅपवरून करणे सोपे झाली. कोट्यवधी यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर होत असल्याने डेटा लिकची शक्यता नाकारता येत नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर होणारा संवाद, माहितीची देवाण-घेवाण ही एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्टेड स्वरूपात होत असल्याने डेटा लीक होत नसल्याचा दावा व्हॉट्सअ‍ॅपकडून वारंवार केला जातो.

ही सर्व पार्श्वभूमी असताना भारत, अमेरिका, युनायटेड किंगडम, सौदी अरेबियासह जगभरातील तब्बल ८४ देशांमधील सुमारे ५० कोटी व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सचा डेटा डार्कवेबवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती समोर आहे. सायबरन्यूजने दिलेल्या अहवालानुसार, एका हॅकिंग कम्युनिटी फॉरममध्ये पोस्ट करण्यात आलेल्या जाहिरातीत व्हॉट्सअ‍ॅपवरील डेटा विक्रीबाबत माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, त्यात व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सचे मोबाईल क्रमांकही असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगार मोबाईल क्रमांकावरून सीमकार्ड क्लोन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते झाल्यास तुमच्या माघारी गुन्हेगारांकडून तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मित्र, नातेवाइकांची फसवणूक करू शकतात. तसेच बँक खात्यावरही डल्ला मारल्या जाऊ शकतो.

तसापा तुमचाही डेटा लीक झाला का?

व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा चोरी झालेल्या ५० कोटी यूजर्समध्ये तुमचाही समावेश आहे का, हे तुम्ही तपासू शकता. सायबरन्यूजच्या संकेतस्थळावर गेल्यावर वरील बाजूला ‘टूल’ नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर त्यातील ‘पर्सनल डेटा लीक चेकर’वर क्लिक करा. नवीन विन्डो ओपन झाल्यावर त्यातील सर्च बॉक्समध्ये तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ई-आयडी प्रविष्ट करून तुमचा डेटा लीक झाली की नाही, हे तपासता येते.

सावधगिरी कशी बाळगणार?

1) हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांकडून तुमच्या माहितीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे यूजर्सनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तुमचा ईमेल आयडी किंवा फोननंबर चोरी करून त्याद्वारे हॅकर्स फिशिंग अटॅक करतात. त्यात तुमच्या संपर्कातील लोकांना मेसेज, ई-मेल किंवा व्हॉइस-मेलच्या माध्यमातून एखादी लिंक पाठवतात.

2) त्यातून संबंधितांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अज्ञात क्रमांकावरून किंवा आपल्या ओळखीच्या लोकांनी पाठवलेल्या संशयास्पद मेसेजची पडताळणी केल्याशिवाय त्याला प्रतिसाद देऊ नका.

3) व्हॉट्सअ‍ॅवरील तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचा असल्यास टू-फॅक्टर ऑन्थेटिकशनचा पर्याय तुम्ही वापरू शकता. तो वापरत नसल्यास सेटिंगमध्ये अकाऊंटवर क्लिक करा. तेथे तुम्हाला टू-फॅक्टर ऑन्थेटिकशन हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून सहा अंकी पीन टाकून आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा. अशा प्रकारे तुमचे टू-फॅक्टर ऑन्थेटिकशन सुरू होईल.

देशनिहाय सर्वाधिक डेटा लीक

देश यूजर्सची संख्या

इजिप्त ४,४८,२३,५४७

इटली ३,५६,७७,३२३

अमेरिका ३,२३,१५,२८२

सौदी अरेबिया २,८८,०४,६८६

फ्रान्स १,९८,४८,५५९

तुर्की १,९६,३८,८२१

मोरोक्को १,८९,३९,१९८

कोलंबिया १,७९,५७,९०८

इराक १,७१,१६,३९८

भारत ६१,६२,४५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.