WhatsApp Features : व्हॉट्सॲपकडून ‘यूजर फ्रेंडली’ फीचर्स!

जगात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया म्हणून व्हॉट्सॲपची ओळख. सुरुवातीला केवळ चॅटिंगपुरते मर्यादित असलेले हे ॲप आता अनेक कारणांसाठी वापरले जाऊ लागले आहे.
whatsapp
whatsappsakal
Updated on
Summary

जगात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया म्हणून व्हॉट्सॲपची ओळख. सुरुवातीला केवळ चॅटिंगपुरते मर्यादित असलेले हे ॲप आता अनेक कारणांसाठी वापरले जाऊ लागले आहे.

जगात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया म्हणून व्हॉट्सॲपची ओळख. सुरुवातीला केवळ चॅटिंगपुरते मर्यादित असलेले हे ॲप आता अनेक कारणांसाठी वापरले जाऊ लागले आहे. त्यासाठी नवनवीन फीचर्सही व्हॉट्सॲपवर मिळायला लागले. असेच काही नवे फीचर्स व्हॉट्सॲपने नुकतेच जारी केले असून, त्यामुळे व्हॉट्सअॅप वापरतानाच्या काही मर्यादा दूर झाल्या आहेत.

रिॲक्शन ईमोजीस

टेलिग्राम, आयमेसेज एवढंच नव्हे, तर इन्स्टाग्रामवर उपलब्ध असलेलं रिॲक्शन इमोजीस हे फीचर आता व्हॉट्सॲपवरदेखील उपलब्ध झाले आहे. या फीचरमुळे युजर्सना एखाद्या मेसेजला काही निवडक ईमोजीसने लगेचच रिॲक्ट करता येणार आहे. सध्या या फीचरमध्ये लाईक, लव्ह, लाफ, सरप्राईज, सॅड आणि थॅंक्स हे सहा इमोजीस असून, लवकरच इतरही उपलब्ध होतील. हे फीचर वापरण्याची कुठल्याही एखाद्या मेसेजवर एक-दोन सेकंद प्रेस केल्यास वरील सहा इमोजीसचे पॉप-अप स्क्रीनवर येतील. त्यापैकी गरजेनुसार तुम्ही वापरू शकता.

2GB डेटा ट्रान्सफर

व्हॉटसॲपवर आतापर्यंत 100 एमबीपर्यंत डेटा शेअर करता येत होता. त्यामुळे मोठ्या साईजचे व्हिडिओ किंवा फाईल्स पाठवताना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेता व्हॉट्सॲपने आता डेटा ट्रान्सफरची मर्यादा तब्बल 2 जीबीपर्यंत वाढवली आहे. हा 2 जीबीपर्यंत शेअर होणारा डेटा हा एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड असेल.

32 जणांचा संवाद

मोबाईल नेटवर्क नसल्यास आपण सहजपणे वाय-फायच्या मदतीने व्हॉट्सॲपवरून व्हॉईस कॉल करण्यास प्राधान्य देतो. सुरुवातीला दोघांमध्ये होणारा व्हॉईस कॉलवरील संवाद हळूहळू अपग्रेड होत वाढत गेला. मोबाईल नेटवर्क नसतानाही केवळ वायफायच्या मदतीने व्हॉट्सअॅप व्हॉईसकॉलच्या मदतीने अनेक मित्र-मैत्रिणी, नातेवाईक एकत्रितपणे व्हॉट्सॲप कॉलिंगचा आनंद लुटतात. युजर्सचा हा आनंद आता आणखी वाढणार आहे. कारण व्हॉट्सअपवरून आता आठ-दहा नाहीत, तर तब्बल 32 जण एकत्रितपणे व्हॉईस कॉल करू शकतील.

512 जणांचा मोठ्ठा ग्रुप

व्हॉट्सॲपने व्हिडिओ कॉलिंग करण्यासाठी आठ जणांची मर्यादा 32 पर्यंत वाढवली, तशीच तुमच्या व्हॉट्सॲपवरील ग्रुप मेंबर्सची संख्याही वाढली आहे. नव्या फीचर अपडेटनुसार, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आता 512 जणांना अँड करता येणार आहे. आतापर्यंत ग्रुपमेंबर्सची मर्यादा 256 जणांची होती. ती आता दुप्पट होणार आहे.

कम्युनिटी फीचर्स

तुमच्या-आमच्या व्हॉट्सॲपवर शाळा-महाविद्यालयांतील मित्र-मैत्रिणींचा, ऑफिसमधील सहकाऱ्यांचा, नातेवाईकांचा तसेच इतर अनेक ग्रुप असतात. ग्रुपमधील सदस्यांची संख्या अधिक असल्याचे कुठल्या ग्रुपमध्ये कुठला मेसेज आला किंवा कुठला मेसेज पाठवला, हे कळत नाही. त्यामुळे एकाचवेळी सर्वांना मेसेज किंवा एखादी फाईल पाठवायची असल्यास आता चिंता राहणार नाही. कारण व्हॉट्सॲपने कम्युनिटी फीचर आणले असून, तुम्हाला हव्या असलेल्या अनेक ग्रुपला एकत्र करता येईल. म्हणजेच, ग्रुपचा ग्रुप तयार करता येईल व सर्वांना एकाचवेळी मेसेज ब्रॉडकास्ट करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.