Russia Luna 25 : रशियाने लाँच केलेलं लूना 25 हे लँडर आता चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. पुढील काही दिवस ते भारताच्या चांद्रयानासोबत या कक्षेत असेल. 21 ऑगस्ट रोजी हे लँडर चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चांद्रयानाप्रमाणेच लूना-25 देखील चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे.
सुमारे 47 वर्षांनंतर रशियाने पहिल्यांदा चांद्रमोहीम राबवली आहे. 11 ऑगस्ट रोजी लूना-25चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. यानंतर पाच दिवसांमध्ये ते चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ असणाऱ्या बोगुस्लावस्की क्रेटर या भागात लूना-२५ लँडिंग करेल. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून, चंद्रावरील मातीचं परिक्षण करणं हे याचं मिशन असणार आहे.
यासाठी Luna 25 मध्ये 31 किलोची उपकरणं बसवण्यात आली आहेत. यातील एक खास यंत्र चंद्रावर सहा इंच खोलपर्यंत खोदकाम करण्यासाठी सक्षम आहे. चंद्रावरील 'फ्रोजन वॉटर', म्हणजेच बर्फावस्थेत असणारं पाणी शोधण्यासाठी हे यान तिथली माती आणि दगडांचे सॅम्पल गोळा करेल.
लूना-25 हे चंद्रावर 21 ऑगस्टला लँड होण्याची शक्यता आहे. तर, चांद्रयान-3 हे 23 तारखेला लँड होणार आहे. ऐनवेळी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, तर या दोन्ही तारखांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पहिल्यांदा कोण उतरतं याबाबत दोघांमध्ये स्पर्धा असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.