Samsung Galaxy A16 5G : दिवाळीआधीच सॅमसंगचा धमाका; 20 हजारपेक्षा कमी किंमतीत लाँच केला Galaxy A16 5G स्मार्टफोन,एकदम खास फीचर्स बघाच

Samsung Galaxy A16 5G Mobile Price Features : सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A16 5G भारतात लॉन्च केला आहे.
Samsung Galaxy A16 price features
Samsung Galaxy A16 5Gesakal
Updated on

Samsung Galaxy A16 5G Launch Price Features : सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A16 5G भारतात लॉन्च केला आहे. सॅमसंगच्या A सिरीजमधील हा स्मार्टफोन, त्याच्या पूर्वीच्या Galaxy A15 च्या यशस्वी मॉडेलनंतर भारतात सादर करण्यात आला आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप, दमदार प्रोसेसर आणि उत्कृष्ट फीचर्सचा समावेश आहे. यासोबतच ग्राहकांसाठी विशेष सवलतीसह खरेदीचा पर्यायही उपलब्ध आहे.

सॅमसंग Galaxy A16 5G ची किंमत भारतात दोन व्हेरिएंटमध्ये ठरविण्यात आली आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 18,999 रुपयेमध्ये उपलब्ध आहे, तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 20,999 रुपये इतकी आहे. ग्राहकांना अ‍ॅक्सिस आणि एसबीआय क्रेडिट कार्डवर 1,000 रुपयेची सवलत मिळणार आहे. स्मार्टफोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, Amazon, Flipkart आणि इतर रिटेल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

Samsung Galaxy A16 5G मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर असून, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजपर्यंतचा पर्याय दिला आहे.

Samsung Galaxy A16 price features
Samsung Discount Offer : खुशखबर! 6 हजारांपेक्षा कमी किंमतीत सॅमसंगचा ब्रँड 5G स्मार्टफोन; कुठं सुरूय खास ऑफर? लगेच बघा

याशिवाय, 1TB पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. सॅमसंगने या स्मार्टफोनसह सहा ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स आणि सहा वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे वचन दिले आहे.

फोटोग्राफीसाठी, Galaxy A16 5G मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्ससह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फक्त 7.9mm जाड असून IP54 प्रमाणपत्रासह धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देतो.

Samsung Galaxy A16 price features
Flipkart Big Diwali Sale : उद्यापासून फ्लिपकार्टचा Big Diwali Sale सुरू; काय आहेत खास डिस्काउंट ऑफर्स? पाहा एका क्लिकमध्ये..

Galaxy A16 5G मध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एका चार्जवर हा फोन 2.5 दिवसांपर्यंत प्लेबॅक वेळ देण्याचे आश्वासन देतो. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचे Knox Vault सिक्युरिटी फिचर आणि NFC सपोर्टसह Samsung Wallet देखील दिला आहे. हा एक चांगला बजेटमधील मोबाईल ठरू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.