Galaxy A16 5G Smartphone Launch : स्मार्टफोन चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. सॅमसंग कंपनीने आपला नवीन Galaxy A16 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. जागतिक बाजारपेठेत यशस्वी ठरलेल्या या फोनचे भारतीय व्हेरियंट काही वेगळ्या फीचर्ससह सादर होणार आहे. भारतात हा फोन मीडियाटेक प्रोसेसरसह येणार असून, यामध्ये 6 OS अपडेट्स आणि 6 वर्षांची सुरक्षा अपडेट्स मिळणार आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन मध्यम श्रेणीतील एक दमदार पर्याय ठरेल.
लॉन्चची तारीख अद्याप जाहीर केलेली नसली तरी, सॅमसंगने या फोनच्या तीन रंग पर्यायांचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये निळा काळा, सोनेरी, आणि हलका हिरवा असे रंग आहेत. हा फोन IP54 रेटिंगसह येणार आहे, ज्यामुळे तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहील.
सॅमसंग Galaxy A16 5G मध्ये 6.5-इंचाचा Super AMOLED स्क्रीन असेल, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह येईल. तसेच, ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 5MP अल्ट्रा-वाइड लेन्स, आणि 2MP मॅक्रो शूटर असेल. सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
हा फोन 5,000mAh बॅटरीसह 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याशिवाय, 5G, NFC, GPS, ब्लूटूथ 5.3, Wi-Fi, आणि USB Type-C सारखे आधुनिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील यामध्ये उपलब्ध असतील.
सॅमसंग Galaxy A16 5G भारतात सुमारे 23,000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा फोन मध्यम श्रेणीतील स्मार्टफोनच्या बाजारात एक आकर्षक पर्याय ठरणार आहे.या फोनच्या खरेदी साथी सॅमसंगचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत कारण असे म्हणले जात आहे की हा एक बजेट फोन असणार आहे. ज्यामध्ये इतर महागड्या स्मार्टफोनच्या तुलनेने चांगले फीचर्स असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.