Samsung Galaxy AI : सॅमसंगचा गॅलेक्सी अनपॅक्ड 2024 हा इव्हेंट नुकताच पार पडला आहे. यामध्ये सॅमसंगने आपली नवी 'गॅलेक्सी एआय' लाँच केली. यामध्ये कित्येक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. यातील लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन आणि सर्कल टू सर्च या फीचर्सची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात या नवीन एआयमध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत. (Galaxy Unpacked 2024)
गॅलेक्सी एआय फीचर असणाऱ्या फोनमध्ये लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन हे फीचर देण्यात आलं आहे. नावातच दिल्याप्रमाणे कॉल सुरू असताना पलीकडची व्यक्ती काय बोलत आहे, ते तुम्हाला लाईव्ह ट्रान्सलेट करता येणार आहे.
हे फीचर सध्या 13 भाषांना सपोर्ट करतं. यामध्ये चिनी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, कोरियन, पोलिश, पोर्तुगीज, थाय, स्पॅनिश, व्हिएतनामीज या भाषांचा समावेश आहे. गॅलेक्सी एआयमध्ये केवळ कॉलच नाही, तर टेक्स्ट मेसेज देखील लाईव्ह ट्रान्सलेट करता येणार आहेत. (Samsung Galaxy AI Live Call Translation)
या फीचरच्या माध्यमातून यूजर्स आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीला केवळ एक सर्कल करुन गुगल सर्च करू शकणार आहेत. यासाठी केवळ सर्कलच नाही, तर हायलाईट, स्क्रिबल किंवा टॅप करूनही तुम्ही हे फीचर वापरू शकता. यासाठी सॅमसंगने गुगलची मदत घेतली आहे. (Galaxy AI Circle to Search)
गॅलेक्सी एआयमध्ये नोट असिस्ट म्हणून एक नवीन फीचर देण्यात आलं आहे. या माध्यमातून एखाद्या रफ नोटला स्वच्छपणे सादर करुन, त्यातील महत्त्वाचे मुद्दे वेगळे काढणं यात शक्य आहे. तसंच, एआय फीचरच्या मदतीने या नोट्सचा सारांश देखील आपोआप काढता येणार आहे. (Galaxy AI Features)
सॅमसंग गॅलेक्सी एआय ही नव्याने लाँच झालेल्या S24 सीरीजमध्ये मिळणार आहे. सोबतच Galaxy S23 Series, Galaxy S23 FE, Galaxy Z Fold 5, Galaxy Z Flip 5 आणि Tab S9 Series या डिव्हाईसेसमध्ये देखील गॅलेक्सी एआयचा सपोर्ट मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.