सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन भारतात लॉंच, किंमत 17,499 पासून सुरु

Samsung galaxy f23 5g launched in India with QUALCOMM snapdragon 750g soc check features
Samsung galaxy f23 5g launched in India with QUALCOMM snapdragon 750g soc check features
Updated on

सॅमसंगने Galaxy F सीरीजचा नवीन फोन Samsung Galaxy F23 5G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Galaxy F22 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. Samsung Galaxy F23 5G मध्ये स्नॅपड्रॅगन ऑक्टा-कोर प्रोसेसर देले आहे. यात तीन मागील कॅमेरे देण्यात आले असून Samsung Galaxy F23 5G चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळत असून हा फोन भारतीय बाजारपेठेत Redmi Note 11T 5G, iQoo Z3 आणि Realme 9 Pro 5G सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.

Samsung Galaxy F23 5G किंमत

Samsung Galaxy F23 5G च्या 4 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची किंमत 17,499 रुपये आहे. त्याच वेळी, 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 18,499 रुपये आहे. हा फोन एक्वा ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन रंगांमध्ये खरेदी करता येईल. Samsung Galaxy F23 5G ची विक्री 16 मार्च रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या साइटवरून होईल. ICICI बँकेच्या कार्डवर 1,000 रुपयांची सूट देखील असेल. याशिवाय दोन महिन्यांसाठी यूट्यूब प्रीमियमचे सबस्क्रिप्शनही फोनसोबत उपलब्ध असेल.

Samsung galaxy f23 5g launched in India with QUALCOMM snapdragon 750g soc check features
Maruti ची आणखी एक CNG कार लॉंच, देते जबरदस्त मायलेज; पाहा किंमत

Samsung Galaxy F23 5G चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F23 5G मध्ये Android 12 आधारित One UI 4.1 आहे. कंपनीचा दावा आहे की या फोनला दोन वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि चार वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. Galaxy F23 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ इन्फिनिटी डिस्प्ले आहे, जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 द्वारे संरक्षित आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर आहे, 6GB पर्यंत रॅम आणि 6GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमसह 128GB पर्यंत स्टोरेज आहे.

Samsung galaxy f23 5g launched in India with QUALCOMM snapdragon 750g soc check features
भारतीय लष्करात नाकारलं; तमिळनाडूतील २१ वर्षाचा इंजिनीअर लढतोय युक्रेनकडून

कॅमेरा

फोनमध्ये तीन मागील कॅमेरे आहेत, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50-मेगापिक्सेल Samsung ISOCELL JN1 सेन्सर आहे, ज्यामध्ये ऍपर्चर f/1.8 आहे. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, Samsung Galaxy F23 5G मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS/A-GPS, NFC, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅकसह डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ सपोर्ट दिला आहे. यात 5000mAh बॅटरी असून ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung galaxy f23 5g launched in India with QUALCOMM snapdragon 750g soc check features
निवडणूक संपली, आता पेट्रोल-डिझेलचे भाव १५ रुपये वाढणार; तज्ञांचे मत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()