नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण सॅमसंग सध्या आपल्या Galaxy A आणि M सीरीजचे नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Galaxy A04e, Galaxy A04 आणि Galaxy M23 5G भारतात लॉन्च होणार्या कंपनीच्या आगामी स्मार्टफोन्सची नावे आहेत. सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर या तिन्ही स्मार्टफोन्सचे सपोर्ट पेज लाइव्ह झाले आहे.असे मानले जाते की आता या हँडसेटच्या लॉन्चची तारीख फार दूर नाही. यासंबंधी एका टिपस्टरने माहिती दिली आहे.
Samsung Galaxy M23 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोन मध्ये कंपनी फुल एचडी + रिझोल्युशन सह 6.6-इंचाचा IPS LCD पॅनल ऑफर करणार आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येईल. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Snapdragon 750G चिपसेट पाहायला मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे उपलब्ध असतील. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर कंपनी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देणार आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 12 वर आधारित OneUI 4.1 वर काम करेल.
Samsung Galaxy A04 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज पर्यायात येईल. प्रोसेसर म्हणून या फोनला Exynos 850 चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात 50 मेगापिक्सलचा मुख्य आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा आहे. समोर, कंपनी सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देणार आहे. Galaxy A सीरीजच्या या फोनमध्ये तुम्हाला 6.5-इंचाचा HD + LCD पॅनल पाहायला मिळेल. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटसह येईल. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh बॅटरी दिली जाईल, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल. OS बद्दल बोलायचे झाले तर फोन Android 12 वर आधारित OneUI Core वर काम करेल.
Samsung Galaxy A04e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन असेल. यामध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज पर्यायात येईल .कंपनी या फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देणार आहे. फोनमध्ये दिलेला डिस्प्ले 6.5 इंच आहे, जो HD + रिझोल्यूशनसह येतो. फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सल प्रायमरी आणि 2-मेगापिक्सल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. त्याच वेळी, कंपनी फोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेन्सर देत आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर, फोन Android 12 वर आधारित OneUI 4.1 core वर काम करतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.