Samsung Upcoming Smartphone : मार्चच्या अखेरपर्यंत Samsung Galaxy M35 5G हा नवा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या फिचर्स

Samsung Upcoming Smartphone : मागील काही दिवसांपूर्वीच सॅमसंग कंपनीने ग्राहकांसाठी A सिरीज लाँच केली होती.
Samsung Upcoming Smartphone
Samsung Upcoming Smartphoneesakal
Updated on

Samsung Upcoming Smartphone : मागील काही दिवसांपूर्वीच सॅमसंग कंपनीने ग्राहकांसाठी A सिरीज लाँच केली होती. या सिरीजमधील २ नवीन मोबाईल फोन्स त्यांनी लाँच केले होते. हे दोन तगडे मोबाईल लाँच केल्यानंतर सॅमसंग आता लवकरच आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

सॅमसंग कंपनीचे यापूर्वी लाँच झालेले स्मार्टफोन्स ग्राहकांच्या पसंतीस उतरले होते. आता ग्राहकांसाठी सॅमसंग एक नवाकोरा तगडा स्मार्टफोन लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. सॅमसंगचा हा नवा मोबाईल Samsung Galaxy M35 5G लाँच होऊ शकतो. बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गीकबेंचच्या डेटाबेसनुसार, सॅमसंगचा हा नवा स्मार्टफोन इन हाऊस Exynos 1380 च्या चिपसेटसह येईल आणि या मोबाईलचा मॉडेल नंबर SM-M356B असा आहे.

सॅमसंगच्या या नव्या स्मार्टफोनबद्दल सांगायचे झाल्यास, हा मोबाईल चार Cortex-A78 कोअर्स (clocked at 2.4 GHz) Cortex-A55 कोअर्स (clocked at 2.0 GHz), octa-core 5nm चिप आणि Mali G68 GPU च्यासोबत सादर केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन मार्चच्या अखेरपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे.

Samsung Upcoming Smartphone
LinkedIn Games : जॉब सर्च करता करता होणार नाही बोअर.. लिंक्ड इनवर आता खेळता येणार गेम

Samsung Galaxy M35 5G मध्ये कोणते फिचर्स असणार ?

या स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल सांगायचे झाल्यास, सॅमसंगच्या या मोबाईलमध्ये ६.६ इंचाचा सुपर Amoled डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच हा स्मार्टफोन १२०hz रिफ्रेश रेटसह आणि फुल एचडीसह समाविष्ट आहे. या मोबाईलचा प्रोसेसर तगडा असून हा मोबाईल Exynos 1380 च्या प्रोसेसरवर काम करतो. हा मोबाईल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह उपलब्ध आहे.

या मोबाईलच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, या मोबाईलमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ३ कॅमेरे आणि ५० मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह ८ मेगापिक्सेल आणि ५ मेगापिक्सेलचे मॅक्रोसेन्सर देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सेल्फीसाठी या मोबाईलमध्ये १३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंतचा स्टोरेजसाठी पर्याय उपलब्ध आहे. कंपनीने अद्याप या मोबाईलची अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, मार्चच्या अखेरपर्यंत हा मोबाईल लाँच होण्याची शक्यता आहे.

Samsung Upcoming Smartphone
Upcoming Smartphones : मार्चमध्ये Samsung Galaxy F 15 ते Realme 12+5G हे दमदार स्मार्टफोन्स होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.