Samsung Galaxy M54 : सॅमसंगने Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G इंडीयन मार्केट मध्ये लाँच केलाय. सॅमसंगने सध्या Galaxy M54 5G ची किंमत जाहीर केलेली नाही परंतु हा स्मार्टफोन 256GB स्टोरेजसह सिल्व्हर कलरमध्ये Samsung च्या वेबसाइटवर लिस्टेड केला आहे. Samsung Galaxy M54 5G मध्ये Exynos 1380 SoC चिपसेट 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आलं आहे.
सॅमसंगने सध्या व्हर्च्युअल रॅम सपोर्टबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. मायक्रोएसडी कार्ड स्लॉट अंतर्गत एक्सपांडेबल स्टोरेज उपलब्ध आहे. Galaxy M54 5G Android 13 मध्ये One UI 5.1 स्किन दिली आहे. फोनमध्ये इतर कोणते फीचर्स असतील याची माहिती बघू.
Samsung Galaxy M54: Specifications
डिस्प्ले : Samsung Galaxy M54 5G मध्ये 6.7 इंच FHD + Infinity-O सुपर सुपर AMOLED प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय 120Hz रिफ्रेश रेट आणि व्हिजन बूस्टर उपलब्ध असतील.
कॅमेरा सेटअप : सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी पुढे 32-मेगापिक्सेल कॅमेरा दिलाय. याशिवाय Galaxy M54 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेल, दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा OIS सह आहे. उर्वरित दोन कॅमेर्यांमध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड लेन्स आणि आणखी 2-मेगापिक्सेल मॅक्रो युनिट समाविष्ट आहे.
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी : Galaxy M54 5G ला 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. Galaxy M54 5G कनेक्टिव्हिटी ऑप्शन मध्ये 5G, 4G, ब्लूटूथ 5.3, NavIC, Wi-Fi 6, NFC कनेक्शन देण्यात आलेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.