Samsung galaxy smart ring price features : सॅमसंगने आपल्या अत्याधुनिक गॅलेक्सी रिंगचे लाँचिंग करून तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांसाठी एक नवी स्मार्ट अॅक्सेसरी सादर केली आहे. प्री-बुकिंगच्या यशस्वी काळानंतर हा रिंग आता ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. आधुनिक डिझाइन आणि अत्याधुनिक फीचर्समुळे हा रिंग तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहे.
गॅलेक्सी रिंगचे डिझाइन अत्यंत मोहक असून, हे टायटॅनियम मटेरिअलपासून बनवलेले आहे. हे तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर आणि टायटॅनियम गोल्ड. या स्टायलिश डिझाइनमुळे रिंग फॅशन आणि तंत्रज्ञानाच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे.
सॅमसंग गॅलेक्सी रिंगची किंमत 38,999 रुपये आहे. या किमतीत प्रीमियम मटेरिअल आणि अत्याधुनिक फीचर्सचा समावेश आहे, ज्यामुळे हा रिंग एक प्रीमियम उत्पादन म्हणून ओळखला जातो.
अत्याधुनिक फीचर्स आणि दीर्घ बॅटरी लाइफ
गॅलेक्सी रिंगमध्ये स्लिप ट्रॅकिंग, हृदय गती मॉनिटरिंग, खेळातील क्रियाकलाप ट्रॅकिंग आणि वॉटर रेसिस्टन्स यांसारख्या अनेक आधुनिक फीचर्सचा समावेश आहे. त्याला IP68 रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे तो 100 मीटर पाण्याच्या आतही सुरक्षितपणे वापरता येतो. रिंगची 18mAh बॅटरी एका चार्जवर तब्बल 6 दिवस टिकते, ज्यामुळे युजर्सला आठवडाभरात चार्ज करण्याची चिंता करावी लागत नाही.
AI आधारित आरोग्य निरीक्षण
गॅलेक्सी रिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्याशी संबंधित अचूक माहिती दिली जाते. सॅमसंग हेल्थ अॅपच्या साहाय्याने युजर्सना त्यांच्या झोपेचे पॅटर्न आणि एकूण आरोग्याची संपूर्ण माहिती मिळू शकते.
सुविधाजनक वायरलेस चार्जिंग
गॅलेक्सी रिंग वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. त्यामुळे रिंगला चार्ज करणे अतिशय सोपे होते. फक्त रिंगला चार्जिंग पॅडवर ठेवून काही वेळातच बॅटरी चार्ज होऊ शकते.
सॅमसंगने गॅलेक्सी झेड सीरीजच्या यशानंतर आता स्मार्टफोन जगतात पुन्हा एक नवा मापदंड स्थापित केला आहे. आता कंपनी तिप्पट फोल्ड होणारा स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी सज्ज आहे, जो हुवावे मेट XT अल्टीमेट एडिशनला टक्कर देईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.