सेल्फीमूड असेल तेव्हाच कॅमेरा ऑन होईल; जाणून घ्या कोणती कंपनी आणखी स्मार्ट फिचर देणार

 Samsung Galaxy, punch hole selfie camera
Samsung Galaxy, punch hole selfie camera
Updated on

स्मार्टफोनच्या जगात रमणाऱ्या आणि वेगवेगळ्या फिचर्सची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी स्मार्टफोनचे आणखी एक भन्नाट मॉडेल लवकरच बाजारात येणार आहे. मागील काही वर्षांपासून अनेक स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या कंपन्या अंडर स्क्रीन सेल्फी कॅमेरा तंत्रज्ञान (New Selfie Camera Technique) विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत.  

ZTE Axon 20 5G हा या तंत्रज्ञानातील पहिला स्मार्टफोन आहे. दक्षिण कोरियन कंपनी Samsung लवकरच असा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. यासाठी त्यांनी प्लॅनिंगही सुरु केल्याची चर्चा आहे. सॅमसंगने पंच-होल कॅमरा (Punch-Hole Camera) सह फुल स्क्रीन स्मार्टफोनसाठी पेटेंट फाइल केले आहे.

फोनच्या कॅमेऱ्या सिस्टीममध्ये  ड्यूल कॅमरा आणि एक फ्लॅशही देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्याचे खास फिचर दिसणार आहे. जेव्हा तुम्ही सेल्फी घेणार असाल तेव्हाच सेल्फी कॅमेरा दिसेल. ज्यावेळी तुम्ही सेल्फीमूडमध्ये नसाल अर्थात तुम्ही सेल्फी घेत नसाल तेव्हा तो दिसणार नाही. सेल्फी घेत नाही तोपर्यंत सेल्फी कॅमेरा दिसणार नाही, असे फिचर या स्मार्टफोनमध्ये देण्यात येणार आहे.

LetsGoDigital च्या वृत्तानुसार, हे फिचर सॅमसंगच्या फ्लॅगशिप हँण्डसेटमध्ये दिसेल. नव्या तंत्रज्ञानाने विकसित झालेले फीचर गॅलेक्सी एस 21 सीरीजमध्ये उपलब्ध होणार नाही. यासाठी स्मार्टफोन युजर्संना 2022 मध्ये बाजारात येणाऱ्या Samsung Galaxy 22 ची प्रतिक्षा करावी लागेल.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.