Samsung Galaxy S24 Series : सॅमसंग कंपनी १७ जानेवारीला लाँच करणार ‘हे’ ३ प्रिमियम स्मार्टफोन्स, जाणून घ्या फिचर्स

सॅमसंग या सुप्रसिद्ध कंपनीचा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट १७ जानेवारीला (बुधवारी) कॅलिफोर्नियामध्ये होणार आहे. या इव्हेंटचे नाव Galaxy Unpacked 2024 असे असणार आहे.
Samsung Galaxy S24 Series
Samsung Galaxy S24 Seriesesakal
Updated on

Samsung Galaxy S24 Series : सॅमसंग या सुप्रसिद्ध कंपनीचा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट १७ जानेवारीला (बुधवारी) कॅलिफोर्नियामध्ये होणार आहे. या इव्हेंटचे नाव Galaxy Unpacked 2024 असे असणार आहे. या तगड्या इव्हेंटमध्ये कंपनी त्यांच्या आगामी स्मार्टफोन्सचे लाँचिंग करण्यासोबतच AI संदर्भातील काही महत्वपूर्ण अपडेट्स देखील देणार आहे. हा लाईव्ह कार्यक्रम तुम्हाला कंपनीच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून पाहता येईल.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग कंपनी या तगड्या कार्यक्रमामध्ये Gauss AI हे टूल लॉंच करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे, आता ग्राहकांमध्ये सॅमसंगच्या Galaxy S24 या सिरीजबद्दल कमालीची उत्सुकता आहे. खास करून मोबाईल प्रेमींमध्ये ही उत्सुकता आहे.

कारण, या वर्षी सॅमसंगची Galaxy S24 ही सिरीज खूपच खास असणार आहे. कारण, या सीरीजमधील मोबाईल्समध्ये कंपनी AI फिचर्सला सपोर्ट करणार आहे. त्यामुळे, या फिचर्सच्या मदतीने युझर्स अनेक गोष्टी करू शकणार आहेत.

सॅमसंग मोबाईलच्या नव्या सिरीजमध्ये AI फिचर महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे बोलले जात आहे. सॅमसंग सिरीजमधील तिन्ही प्रिमियम मोबाईलबद्दल आणि फिचर्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Samsung Galaxy S24 Series
Mahindra XUV400 2024 : महिंद्राने लाँच केली नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही! नेक्सॉनला देणार का शॉक?

सॅमसंग Galaxy S24

सर्वात आधी आपण सॅमसंग Galaxy S24 या मोबाईलबद्दल जाणून घेऊयात. या मोबाईलमध्ये तुम्हाला 6.2 इंचाचा FHD प्लस डायनॅमिक 2x AMOLED डिस्प्ले मिळेल. यासोबतच 120hz च्या रिफ्रेश रेटसह आणि 2600 nits च्या पीक ब्राईटनेससह मिळेल.

फोटोग्राफीसाठी या मोबाईलचा कॅमेरा तगडा आहे. या मोबाईलमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप मिळेल. ज्यामध्ये ५० मेगापिक्सेल्सचा प्राथमिक कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेल्सचा वाईड कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल्स झूमसह 10 मेगापिक्सेल्सचा टेलिफोटो कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी खास १२ मेगापिक्सेल्सचा कॅमेरा या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.

आता या मोबाईलच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 4000 mAh ची बॅटरी तुम्हाला मिळेल. तसेच, टाईप-सी चे चार्जिंग आणि IP68 रेटिंग आणि Exynos 2400 प्रोसेसर या मोबाईलमध्ये उपलब्ध असेल. या मोबाईलची किंमत किती असेल? याची माहिती अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही.

सॅमसंग S24 Plus

S24 Plus या मोबाईलबद्दल बोलायचे झाल्यास याचे बरेचसे फिचर्स हे Galaxy S24 शी मिळतेजुळते आहेत. बाकी या मोबाईलमध्ये तुम्हाला Exynos 2400 हा प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाल्यास, या मोबाईलमध्ये बेस मॉडेलप्रमाणेच कॅमेऱ्याचे सेटअप मिळू शकेल.

आता बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास सॅमसंगच्या या मोबाईलमध्ये 4900mAh ची बॅटरी आणि 6.7 इंचाचा QHD प्लस डिस्प्ले हा 120hz रिफ्रेश रेटसोबत मिळेल. या मोबाईलची किंमत किती असेल? याबाबत कंपनीने कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

Galaxy S24 Ultra

सॅमसंगच्या या मोबाईलमधील फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या मोबाईलमध्ये तुम्हाला 6.8 इंच आणि QHD+AMOLED डिस्प्ले मिळेल. यामध्ये 120hz चा रिफ्रेश रेट असेल.

विशेष म्हणजे हा मोबाईल Qualcomm च्या नवीनतम चिपसेटला आणि Snapdragon 8 Gen 3 SOC ला सपोर्ट करेल. त्यामुळे, या मोबाईलचा वापर करताना युझर्सना नवा अनुभव मिळणार आहे. आता फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये क्वाड कॅमेरा उपलब्ध असेल.

ज्यामध्ये 200 मेगापिक्सेल्सचा तगडा प्राथमिक कॅमेरा, १२ मेगापिक्सेल्सचा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 5x ऑप्टिकल झूमसह 50 MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि 3x  ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेल्सचा टेलिफोटो सेन्सर असेल.

आता बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास 5000 mAh बॅटरी आणि 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB UFS 4.0 स्टोरेजची क्षमता असेल. सर्व फिचर्सच्या बाबतीत हा मोबाईल सर्वात तगडा आहे. परंतु, कंपनीने अद्याप या मोबाईलची किंमत जाहीर केलेली नाही

Samsung Galaxy S24 Series
Kia Sonet : आठ लाखांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाली कियाची प्रीमियम कार! कशी आहे नवी सोनेट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.