Samsung Galaxy S24 Series : सॅमसंगची नवी स्मार्टफोन सीरीज लाँच, मिळणार 'गॅलेक्सी एआय'चे भन्नाट फीचर्स!

या सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये एआय फीचर्स देण्यात आले आहेत. ही सीरीज अँड्रॉईड 14 आधारित One UI 6.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालते.
Samsung Galaxy S24 Series
Samsung Galaxy S24 SerieseSakal
Updated on

Samsung Galaxy S24 Series : सॅमसंगचा बहुप्रतिक्षित गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट बुधवारी रात्री पार पडला. या इव्हेंटमध्ये सॅमसंगची गॅलेक्सी S24 ही स्मार्टफोन सीरीज लाँच करण्यात आली. टीझर आणि लीक्समध्ये समोर आलेल्या माहितीप्रमाणेच, या सीरीजमध्ये गॅलेक्सी एआयचे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. (Galaxy AI)

Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra हे तीन स्मार्टफोन या कार्यक्रमात लाँच करण्यात आले. या सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन, चॅट असिस्ट, सर्कल टू सर्च असे एआय फीचर्स देण्यात आले आहेत. ही सीरीज अँड्रॉईड 14 आधारित One UI 6.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालते. यामध्ये डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S24

या सीरीजच्या बेस मॉडेलमध्ये 6.2 इंच मोठा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 50MP क्षमतेचा आहे. सोबतच यामध्ये 12MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 3X ऑप्टिकल झूम असणारी 10MP टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी यामध्ये 12MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

या फोनमध्ये Exynos 2400 SoC चिपसेट दिला आहे. तसंच यामध्ये 7 वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट देण्यात येणार आहेत. या फोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W वायर्स आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनला IP68 डस्ट अँड वॉटर रझिस्टंट रेटिंग मिळाली आहे. सोबतच यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आलं आहे. (Samsung Galaxy S24 Features)

सॅमसंग गॅलेक्सी S24 प्लस

या सीरीजमधील Galaxy S24+ या मॉडेलमध्ये 6.7 इंच मोठा डिस्प्ले मिळतो. याचा कॅमेरा आणि प्रोसेसर सेटअप हा गॅलेक्सी S24 प्रमाणेच आहे. यामध्ये बॅटरी मात्र मोठी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 4,900mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W वायर्स आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. बाकी फीचर्स देखील S24 प्रमाणेच आहेत. (Samsung Galaxy S24 Plus Features)

सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा

या मॉडेलमध्ये 6.8 इंच मोठा QHD डिस्प्ले देण्यात आला आहे. आतापर्यंतच्या गॅलेक्सी टॉप मॉडेल्समध्ये कर्व्ह्ड डिस्प्ले देण्यात येत होता. मात्र, S24 Ultra या मॉडेलमध्ये फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्लालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 SoC हा लेटेस्ट प्रोसेसर मिळतो.

यामध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा हा तब्बल 200MP क्षमतेचा आहे. सोबत यामध्ये 5X झूम असणारा 50MP टेलिफोटो कॅमेरा, 12MP अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 3X झूम असणारी एक 10MP लेन्स दिली आहे. यामध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी मिळते. (Samsung Galaxy S24 Ultra features)

किंमत

सॅमसंग गॅलेक्सी S24 या स्मार्टफोनमध्ये दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत. यातील 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 799 डॉलर्स एवढी आहे. तर 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 849 डॉलर्स एवढी आहे. (Galaxy S24 Price)

सॅमसंग गॅलेक्सी S24 प्लस या मॉडेलचे देखील दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत. यातील 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 999 डॉलर्स आहे. तर 12GB+512GB व्हेरियंटची किंमत 1,119 डॉलर्स एवढी आहे. (Galaxy S24 Plus Price)

सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा या मॉडेलच्या सर्व व्हेरियंटमध्ये 12GB रॅम देण्यात आली आहे. यामध्ये 256GB, 512GB आणि 1TB असे तीन स्टोरेज ऑप्शन मिळतात. याची किंमत 1,200 डॉलर्सपासून सुरू होते. (Galaxy S24 Ultra Price)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.