Samsung Galaxy XCover 7 : सॅमसंगने भारतात लाँच केला आपला पहिला 'रग्ड स्मार्टफोन'; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

यात 4050mAh क्षमतेची रिप्लेसेबल बॅटरी देण्यात आली आहे. ही 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष म्हणजे यात चार्जिंगसाठी टाईप-सी पोर्ट आणि पोगो पिन्स असे दोन पर्याय मिळतात.
Rugged Smartphone
Rugged SmartphoneeSakal
Updated on

Samsung Rugged Smartphone : सॅमसंगने भारतात आपला रग्ड स्मार्टफोन लाँच केला आहे. हा सॅमसंगचा भारतातील पहिला मिलिट्री ग्रेड स्मार्टफोन आहे. Samsung Galaxy XCover 7 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितींमध्ये देखील हा मोबाईल काम करू शकतो.

या स्मार्टफोनला MIL-STD-810H सर्टिफिकेट मिळालं आहे. अमेरिकेतील मिलिट्रीमार्फत एखाद्या डिव्हाईसची मजबूती तपासून हे सर्टिफिकेट देण्यात येतं. जानेवारीतच कंपनीने हा मोबाईल ग्लोबली लाँच केला होता. आता भारतातदेखील हा उपलब्ध झाला आहे.

फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच मोठा TFT LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस प्लस प्रोटेक्शन मिळतं. यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ SoC चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी यात Mali G57 GPU सपोर्ट मिळतो. यामध्ये अँड्रॉईड 14 आधारित OneUI ही ऑपरेटिंग सिस्टीम दिली आहे.

Rugged Smartphone
Honor X9b : आता मोबाईल फुटणारच नाही? स्क्रीनमध्ये मिळणार चक्क 'एअरबॅग' टेक्नॉलॉजी, कधी होणार लाँच?

या फोनच्या मागच्या बाजूला 50MP क्षमतेचा कॅमेरा दिला आहे, तर सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 4050mAh क्षमतेची रिप्लेसेबल बॅटरी देण्यात आली आहे. ही 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष म्हणजे यात चार्जिंगसाठी टाईप-सी पोर्ट आणि पोगो पिन्स असे दोन पर्याय मिळतात.

व्हेरियंट अन् किंमत

या स्मार्टफोनमध्ये दोन एडिशन आहेत. स्टँडर्ड एडिशनची किंमत 27,208 रुपये आहे; तर एंटरप्राईज एडिशनची किंमत 27,530 रुपये आहे. हे स्मार्टफोन सॅमसंगच्या वेबसाईटवर आणि कॉर्परेट स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील. स्टँडर्ड व्हेरियंटवर एका वर्षाची वॉरंटी मिळते, तर एंटरप्राईज एडिशनवर 2 वर्षांची वॉरंटी मिळते.

Rugged Smartphone
Digital Detox : मोबाईल-सोशल मीडियामुळे बिघडतंय मानसिक आरोग्य; सरकार राबवणार 'डिजिटल डीटॉक्स' मोहीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.