सॅनिटाइझरने मोबाइल साफ करताय? मग वेळीच सावध व्हा, नाहीतर...

sanitizer makes mobile worse use this method to sanitize mobile
sanitizer makes mobile worse use this method to sanitize mobile
Updated on

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने मांडलेला उच्छाद अद्यापही कायम आहे. या विषाणूमुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. याच भीतीपोटी अनेक जण सॅनिटाइझरचा अतिरेक वापर करत आहेत. इतकंच नाही तर काहीजण मोबाईलदेखील सॅनिटाइझरने सॅनिटाइज करत आहेत. परंतु, मोबाईलवर सॅनिटाइझर लावणं योग्य आहे की नाही? याचा विचार कोणीही करत नाही. सॅनिटाइझरचा अतिरेक वापर करणं हे चांगलंच महागात पडू शकतं. त्यामुळे मोबाईल साफ करतांना चुकूनही सॅनिटाइझरचा वापर करु नये. जर याचा वापर केला तर नेमकं काय घडू शकतं हे जाणून घेऊयात.

सध्याच्या काळात सतत हात धुणे, मास्क आणि सॅनिटाइझर वापरणं अनिर्वाय झालं आहे. परंतु, स्वत: च्या सुरक्षेची काळजी घेत असतांनाच फोन किंवा आपण वापरत असलेल्या अन्य वस्तूंची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. परंतु, या वस्तू साफ करण्यासाठी सॅनिटाइझर हा योग्य मार्ग नाही. त्यामुळे जर फोन किंवा मोबाईल साफ करण्यासाठी तुम्ही सॅनिटाइझरचा वापर करत असाल तर वेळीच थांबलं पाहिजे.

मोबाईल साफ करण्यासाठी जर तुम्ही सॅनिटाइझरचा वापर करत असाल तर तुमचा फोन लवकरच खराब होऊ शकतो.  यात डिसप्ले, हेडफोन जॅक खराब होण्याची शक्यता असते.

अल्कोहोलयुक्त सॅनिटाइझरचा वापर केल्यामुळे मोबाईलचा साऊंड बिघडण्याची शक्यता असते. इतकंच नाही तर फोनमध्ये शॉर्ट सर्किटदेखील होऊ शकतं. विशेष म्हणजे कॅमेरा लेन्स,डिसप्ले यांच्यावर डाग पडतात.

दरम्यान, जर तुम्हाला मोबाईल साफ करायचा असेल तर त्यासाठी कापूस किंवा टिश्शू पेपरचा वापर करा. कधीही फोन पुसण्यासाठी सॅनिटाइझर किंवा पाण्याचा वापर करु नका.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.