Space Debris : अवकाशात वाढतोय उपग्रहांचा कचरा;युरोपिय अवकाश संस्थेची माहिती,दीर्घकालीन धोका

हवामानाचा अभ्यास करण्यासाठी, जागतिक दळणवळण आणि दिशादर्शक यंत्रणा वितरित करण्यासाठी आणि महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रश्नाचे उत्तर देण्यास मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचे कार्य पृथ्वीवरून सोडलेली अवकाशयाने करीत असतात, पण सध्या अवकाशात निकामी याने, उपग्रह यांची गर्दी झाली आहे.
Space Debris
Space Debrissakal
Updated on

वॉशिंग्टन : हवामानाचा अभ्यास करण्यासाठी, जागतिक दळणवळण आणि दिशादर्शक यंत्रणा वितरित करण्यासाठी आणि महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रश्नाचे उत्तर देण्यास मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचे कार्य पृथ्वीवरून सोडलेली अवकाशयाने करीत असतात, पण सध्या अवकाशात निकामी याने, उपग्रह यांची गर्दी झाली आहे. अवकाशात वेगाने फिरणाऱ्या या कचऱ्यामुळे आपल्या भावी अवकाश मोहिमांना धोका निर्माण झाला आहे.

युरोपियन अवकाश संस्थेने (इएसए-इसा) नुकत्यात प्रसिद्ध केलेल्या ‘अवकाश पर्यावरण अहवाल-२०२४’ ही बाब नमूद केली आहे. पृथ्वीच्या चारही बाजूंना अवकाश कचरा जमा झाला आहे. आपले अवकाश असुरक्षित होत आहे. पृथ्वीच्या कक्षेत फिरणारे उपग्रह आणि ते निकामी झाल्यानंतर होणाऱ्या कचऱ्याचा आढावा अहवालात घेतला आहे. हा अहवाल २०१७ पासून दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. अवकाशीय घडामोडींची नोंद यात घेतली जाते. अवकाशीय कचऱ्याचा प्रश्‍नाचे गांभीर्य यातून दाखविले आहे.

अहवालातील निरीक्षणे

  • पृथ्वीचे परिभ्रमण वातावरण हा एक मर्यादित स्रोत आहे

  • पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित केल्या जाणाऱ्या व्यावसायिक उपग्रहांच्या संख्येत सातत्याने वाढ

  • अवकाशात इतस्ततः फिरणारे बहुतेक उपग्रह हे २०२३ मध्ये सोडलेले आहेत

  • विशिष्ट निम्न-पृथ्वी कक्षेतील व्यावसायिक उपग्रह नक्षत्रांची संख्या आणि प्रमाण वाढतच आहे.

  • निगराणी यंत्रणेद्वारे सध्या ३५ हजारपेक्षा जास्त उपकरणांवर लक्ष

  • अवकाशात चार इंचाच्या आकारापेक्षा मोठे असलेले सुमारे २६ हजार तुकडे फिरत आहेत

  • अवकाशीय कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करूनही, कचरा वाढतच आहे

  • वाढत्या कचऱ्यामुळे आपण दीर्घकालीन असुरक्षित पर्यावरणाला निमंत्रण देत आहोत

  • उपग्रह निकामी झाल्यानंतर परिभ्रमण कक्षा सोडण्याचे प्रमाण कमी

  • कार्य संपलेल्या उपग्रहांचे तुकडे त्याच कक्षेत अनेक वर्षे फिरत राहतात. ते जास्त धोकादायक असतात

  • निष्क्रिय उपग्रहांशी सक्रिय उपग्रहांनी टक्कर टाळण्यासाठी विविध पर्याय शोधले पाहिजेत

  • अवकाश कचरा कमी करण्यासाठी स्पेस उपाय सुरू झाले असले तरी ज्या प्रमाणात कचरा वाढत आहे, त्याप्रमाणात हे उपाय त्रोटक आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com