गुगलने शनिवारी प्रख्यात भारतीय गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांना त्यांच्या भौतिकशास्त्र आणि गणित क्षेत्रातील असाधारण योगदानाबद्दल विशेष डूडलद्वारे आदरांजली वाहिली आहे.
सत्येंद्र नाथ बोस हे 1920 च्या दशकाच्या सुरुवातीस क्वांटम मेकॅनिक्सवरील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध होते. 1924 मध्ये याच दिवशी सत्येंद्र नाथ बोस यांनी त्यांचा क्वांटम फॉर्म्युलेशनचा फॉर्म्यूला जर्मन शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांना पाठवला. याला क्वांटम मेकॅनिक्समधील एक महत्त्वपूर्ण शोध असं आइनस्टाईन यांनी संबोधलं. असं म्हणतात की, बोस यांनी अल्बर्ट आइनस्टाईन यांना आपले गुरू मानलं होतं.
1894 मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या बोस यांना भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खनिजशास्त्र, तत्त्वज्ञान, कला, साहित्य आणि संगीत यासह विविध क्षेत्रांमध्ये रुची होती. बोस यांनी कलकत्ता येथील हिंदू शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले प्रत्येक संस्थेत त्यांनी सर्वाधिक गुण मिळवले होते.
भौतिकशास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस आणि इतिहासकार प्रफुल्ल चंद्र रे यांच्याकडून प्रेरणा घेत बोस यांनी 1916 ते 1921 या काळात कलकत्ता विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात लेक्चरर म्हणूनही काम केलं.
शास्त्रीय भौतिकशास्त्राचा कोणताही संदर्भ न घेता प्लँकच्या क्वांटम रेडिएशन कायद्याचा शोध घेणारा एक पेपर त्यांनी लिहिला. बोस यांना 1954 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.