SBI Banking Service on WhatsApp: इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मेसेजिंगपासून ते बँकिंगपर्यंत अनेक कामे WhatsApp च्या माध्यमातून शक्य आहेत. तुम्ही जर SBI यूजर्स असाल तर बँकेच्या कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत. तुम्हाला सर्व माहिती WhatsApp वरच मिळेल.
SBI खातेधारकांना WhatsApp वरच मिळेल या सुविधा
अकाउंट बॅलेन्सची माहिती
मिनी स्टेटमेंट
पेंशन स्लिपशी संबंधित काम
कर्जाबाबत माहिती
डिपॉजिटची माहिती
NRI सर्व्हिसेज
तक्रार करणे
प्री-अप्रूव्हड कर्जाची माहिती
हेही वाचा: Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका, Altroz चे रेसर व्हेरिएंट लाँच; फीचर्स खूपच जबरदस्त
WhatsApp वर सुरू करा बँकिंग सेवा
यासाठी https://bank.sbi वेबसाइटवर जा.
येथे Digital पर्यायावर क्लिक करून WhatsApp Banking वर जा,
त्यानंतर येथे देण्यात आळेल्या क्यूआर कोडला स्कॅन करा.
तुम्हाला +९१९०२२६९०२२६ नंबरवर 'Hi' लिहून पाठवावे लागेल.
आता तुम्ही बँकिंग सेवांचा फायदा घेऊ शकता.
SMS च्या माध्यमातून करा रजिस्ट्रेशन
तुम्ही मेसेज पाठवून रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुम्हाला WAREG\u003c ACCOUNT NUMBER लिहून +९१७२०८९३३१४ वर मेसेज पाठवावा लागेल.
यानंतर WhatsApp बँकिंग सर्व्हिस सुरू होईल.
ही सर्व्हिस सुरू झाल्यास सेवांचा लाभ घेण्यासाठी +९१९०२२६९०२२६ नंबरवर 'Hi' लिहून मेसेज पाठवावा लागेल.
हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.