EV Loan : डाऊन पेमेंटची चिंता सोडा, सरकारी बँक देतेय इलेक्ट्रिक गाडीसाठी 100% लोन; जाणून घ्या डीटेल्स

Electric Vehicle Loan : इलेक्ट्रिक कारच्या काही ठराविक मॉडेल्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे. इतर कारसाठी 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळत आहे.
SBI EV Loan
SBI EV LoaneSakal
Updated on

Electric Car Loan zero down payment : सध्याचा जमाना इलेक्ट्रिक कार्सचा आहे. चार्जिंग स्टेशन्सची वाढणारी संख्या, आणि विविध प्राईज रेंजमध्ये उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रिक कार यामुळे बहुतांश लोक पेट्रोल-डिझेल ऐवजी ईव्हीला प्राधान्य देत आहेत. सरकार देखील लोकांनी पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक गाड्या घ्याव्यात यासाठी प्रयत्न करत आहे. आता देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने ईव्हींसाठी विशेष कर्ज योजना सुरू केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) आता इलेक्ट्रिक कारच्या काही विशिष्ट मॉडेल्सवर चक्क 100 टक्के कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. म्हणजेच अगदी शून्य रुपये डाऊनपेमेंट देऊन देखील तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार आपल्या घरी नेऊ शकता. इतर काही मॉडेल्ससाठी ऑन-रोड किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत देखील कर्ज उपलब्ध आहे. (SBI EV Loan Offer)

किती आहे व्याजदर?

या कर्जासाठी 3 ते 8 वर्षांचा परतफेड अवधी तुम्ही निवडू शकता. SBI सध्या सामान्य कारसाठी 8.85 ते 9.80 टक्के व्याजदर आकारत आहे. तर इलेक्ट्रिक कारसाठी हा दर 8.75 ते 9.45 टक्के एवढा आहे. म्हणजेच ईव्हींसाठी एसबीआय आपल्या व्याजदरात 0.25 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. (SBI Electric Car Loan)

SBI EV Loan
BYD Seal India Launch : टेस्लाप्रमाणे स्टायलिश लुक, तब्बल 700 किलोमीटर रेंज.. भारतात लाँच होणार खास इलेक्ट्रिक सेडान! किती आहे किंमत?

कुणाला किती मिळेल कर्ज?

विविध उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रमाणात कर्ज मिळू शकतं. जर तुम्ही सरकारी कर्मचारी आहात, आणि तुमचं वार्षिक वेतन कमीत कमी तीन लाख रुपये आहे, तर तुम्हाला महिन्याच्या पगाराच्या 48 पट रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.

शेती हा मुख्य उत्पन्न स्त्रोत असणाऱ्या व्यक्तींना, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 4 लाख रुपये आहे; त्यांना एकूण कमाईच्या तीन पट कर्ज मिळू शकतं. खासगी नोकरी, व्यापार करणाऱ्या व्यक्तींना ITR मध्ये दिलेल्या ग्रॉस टॅक्सेबल इनकम किंवा नेट प्रॉफिटच्या चार पट कर्ज मिळू शकतं.

आवश्यक कागदपत्रे

इलेक्ट्रिक कारसाठी कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांचे बँक अकाउंट डीटेल्स असणं गरजेचं आहे. यासोबतच दोन पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र, अ‍ॅड्रेस प्रूफ अशा कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.

SBI EV Loan
Tata CNG Automatic : टाटाने लाँच केली देशातील पहिली 'ऑटोमॅटिक सीएनजी' कार; जाणून घ्या मायलेज, फीचर्स अन् किंमत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.