Sci-tech : त्याची संघर्षकथा खरंतर एखाद्या चित्रपटात दाखवल्यासारखी आहे. प्रिवेन रेड्डी हा आज अब्जाधीश आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात त्याच्या चार कंपन्या आहेत. याचबरोबर इतर अनेक कंपन्यांमध्ये तो गुंतवणूक करतो. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी त्याला हे यश मिळाले आहे. त्याचे बालपण मध्यमवर्गीय परिस्थितीत गेले. दक्षिण आफ्रिकेतील डरबन शहरात हे कुटुंब राहत असे. तो मिळून चार भावंडे होती. त्याचे वडील या चारही भावंडांना चांगला उद्योजक कसे बनायचे, याचे धडे देत असत. त्याच्या अतिशय तरुण वयात वडील निधन पावले. त्याच्या आईने दुसऱ्या एका माणसाशी लग्न केले, जो पुढे अल्कोहोलिक झाला.
या चारही मुलांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. या मुलांना जेवण देण्यापेक्षा त्याचे सावत्र वडील दारू विकत घेत असत. त्यामुळे प्रिवेनला फार लवकर काम करून पैसे मिळवावे लागले. डरबन शहरातील एका ओपन थिएटर जवळील हॉटेलमध्ये तो वेटरचे काम करत असे. आपले आयुष्य असेच छोट्या-मोठ्या नोकऱ्या करीत घालवायचे, हे त्याच्या डोक्यात होते; पण एके दिवशी प्रिवेनने एका माणसाला पिझ्झा सर्व्ह केला. त्या माणसाने पिझ्झा अर्धा खाल्ला आणि प्रिवेनला म्हणाला, ‘हा पिझ्झा टीप म्हणून तुला दिलेला आहे. कुत्र्याच्या पिशवीतून घरी घेऊन जा.’ हे अपमानास्पद शब्द प्रिवेनच्या मनाला लागले. जग गरीब माणसाला असं वागवतं?... त्याने श्रीमंत व्हायचं ठरवलं. आपल्या वडिलांच्या कबरीवर तो गेला आणि त्याने यशस्वी होण्याची शपथ घेतली.
प्रिवेनने ती नोकरी सोडली आणि त्याने एक कंपनी सुरू केली. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर त्याला यश मिळाले. त्याच्या वडिलांनी त्याला काही तत्त्वे शिकवली होती. त्यानुसार त्याने आपली वाटचाल सुरू केली आणि आज चार अब्ज रुपयांची त्याची संपत्ती आहे. चारशे लोक त्याच्यासाठी काम करतात. अतिशय लहान वयात तो हे यश मिळवू शकला, कारण त्याला गरीब राहायचे नव्हते!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.