Olympic 2024 : ऑलिम्पिक खेळाडूंच्या वयामध्ये आहे फिक्सिंग? यशस्वी होण्याच्या वयाबद्दल शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा

Olympic Athletes Peak Age : नव्या संशोधनानुसार,ऑलिम्पिकमध्ये यशस्वी ठरणाऱ्या ट्रॅक आणि फील्ड खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीच्या वयाचा उलगडा झाला आहे. हे वय फिक्स असते असे संशोधनातून समोर आले आहे.
Researchers Identify Peak Age for Olympic Success
Researchers Identify Peak Age for Olympic Successesakal
Updated on

Olympic Athletes Research : पॅरिसमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडू जमले असताना, वॉटरलू विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून एक आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहे. या अभ्यासातून ऑलिम्पिकमध्ये यशस्वी ठरणाऱ्या ट्रॅक आणि फील्ड खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीच्या वयाचा उलगडा झाला आहे.

रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या सिग्निफिकन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनामुळे वय, सराव आणि आघाडेवरच्या खेळाडूंच्या कामगिरी यांच्यातील गुंतागुंतीच्या समिश्रणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

या अभ्यासाचे नेतृत्व डेव्हिड अवोसोगा या डाटा सायन्सच्या मास्टर्सच्या विद्यार्थ्याने केले. त्यांनी १९९६ पासून ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचा आकडेवारी अभ्यास केला. या अभ्यासातून गेल्या तीन दशकांमध्ये ऑलिम्पिक ट्रॅक आणि फील्ड खेळाडूंची सरासरी वय जवळजवळ २७ वर्षे राहिली आहे हे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. विशेष म्हणजे, पुरुष आणि महिला दोघांसाठीही हे वय सरासरी आहे.

Researchers Identify Peak Age for Olympic Success
Sunita Williams in Space : सुनीता विलियम्सला अंतराळात मिळाली एक दिवसाची सुट्टी; काय-काय केली धमाल? एकदा बघाच

या अभ्यासातील आणखी एक मनोरंजक निष्कर्ष म्हणजे या खेळाडूंची यशाचे पिक वय हे २७ आहे. या वयानंतर, खेळाडूची सर्वोत्तम कामगिरी येण्याची शक्यता ४४ टक्क्यांपर्यंत कमी होते आणि पुढच्या वर्षी ही शक्यता आणखी कमी होते.

या अभ्यासात पाच मुख्य घटकांचा समावेश होता: लिंग, राष्ट्रीयत्व, स्पर्धेचा प्रकार, आघाडीवरच्या सरावाचा कालावधी आणि ही स्पर्धा ऑलिम्पिक वर्षाची आहे की नाही. या अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे येत्या वर्षी ऑलिम्पिक असणे हे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.

Researchers Identify Peak Age for Olympic Success
Spacesuit Research : अंतराळवीरांना पाण्याच्या कमतरतेचं आता नो टेंशन! संशोधकांनी बनवलं खास स्पेससूट, कशापासून बनवणार पाणी?

हे संशोधन विश्लेषण मुख्यत्वे सिद्धांतिक असले तरी, या निष्कर्षांचा फायदा खेळाडू आणि चाहत्यांनाही होऊ शकतो असे संशोधकांचे मत आहे.

अभ्यासकांनी की, "आम्ही अशा घटकांची यादी तयार केली आहे ज्यांच्या आधारे तुमच्या यशाचे शिखर वय (peak age) काय आहे हे समजण्यास मदत होते. ऑलिम्पिकचे वर्ष, तुमची जनुके आणि तुमचे राष्ट्रीयत्व हे बदलता येणार नाहीत, पण या जैविक आणि बाह्य घटकांनुसार तुमची सराव पद्धत थोडीफार बदलून तुम्ही तुमची कामगिरी आणखी चांगली करू शकता." हा अभ्यास ऑलिम्पिक खेळाडू किती प्रमाणात आढळतात या सांख्यिकीय दुर्मीळतेवरही प्रकाश टाकनारा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.