Self Healing Car : आता अपघातानंतर आपोआप ठीक होणार कारवरील डेंट; शास्त्रज्ञांनी लावला मोठा शोध

सर्व प्रकारच्या धातूंवर हा प्रयोग करुन पाहण्यात येत आहे.
Self Healing Car
Self Healing CareSakal
Updated on

तुमच्याकडे जर कार असेल, तर नक्कीच तुम्ही तिला जीवापाड जपत असणार. आपल्या गाडीचा हलकासा स्क्रॅच जरी गेला, तरी कित्येक जण हळहळतात. अशातच जर अपघात होऊन कारला मोठा डेंट पडला; तर होणाऱ्या खर्चाचा विचार करूनच लोकांना टेन्शन येतं.

गाडीचा इन्शुरन्स असला, तर खर्च नक्कीच कमी होतो. मात्र, तरीही गाडीला सर्व्हिस सेंटरला न्या, ती दुरूस्त करून घ्या हे काम आलंच. शिवाय, त्यानंतरही गाडी परत नव्यासारखी दिसेलच याची गॅरंटी देता येत नाही. मात्र, आता या सगळ्यावर शास्त्रज्ञांनी अगदी जालीम उपाय शोधला आहे.

Self Healing Car
Car Tips : गाडीच्या सायलेन्सरपर्यंत पाणी आलं तर काय कराल? लाखोंच्या नुकसानापासून वाचवेल एक साधी आयडिया

शास्त्रज्ञांनी अशा टेक्नॉलॉजीचा शोध लावला आहे, ज्यामुळे कारवरील मेटल हे अपघातानंतर आपोआप पहिल्यासारखं होणार आहे. सँडिया नॅशनल लॅब आणि टेक्ससच्या ए अँड एम युनिवर्सिटीने याबाबत संयुक्तपणे संशोधन केलं आहे. यामध्ये त्यांनी स्पेशलाईज्ड ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे मेटल स्वतःच स्वतःला दुरुस्त करू शकणार आहे.

प्लॅटिनमवर यशस्वी प्रयोग

सध्या या तंत्रज्ञानाचा प्रयोग केवळ प्लॅटिनम धातूवर करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता हळू-हळू इतर धातूंवर असाच प्रयोग करण्यात येणार आहे. इतर धातूंवरील प्रयोग देखील यशस्वी झाले, तर धातूची कोणतीही वस्तू आपोआप दुरुस्त होणं शक्य होईल.

Self Healing Car
Electric Cars : हुशार असाल तर 2025 आधी इलेक्ट्रिक कार खरेदी करू नका, खुद्द कियाच्या नॅशनल हेडने सांगितलं कारण

कारच्या बॉडी या धातूच्याच बनलेल्या असतात. त्यामुळे हे संशोधन मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्यास, थेट कारमध्ये हे तंत्रज्ञान वापरता येईल. यामुळे भविष्यात आपोआप ठीक होणाऱ्या कार उपलब्ध होतील अशी खात्री वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.