Life on Mars : लद्दाखमधील एका नव्या शोधामुळे बाहेरील ग्रहांवर जीवन असण्याची शक्यता अधिक दृढ झाली आहे. लद्दाख हे आपल्या कठीण वातावरणासाठी ओळखले जाते. येथील उच्च पातळीवरील अतिनील किरणांचा प्रादुभाव, तापमानातील वेगाने होणारे बदल आणि पाण्याची कमतरता यामुळे हे ठिकाण मंगळ ग्रहाच्या वातावरणासारखेच आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
भारतीय पुरातत्वशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांना लद्दाखमध्ये खडकावरील एका पातळ थरात सूक्ष्म जीवांचे अंश जीवाश्म सापडले आहेत. या शोधामुळे खडकांच्या वाढीमध्ये सूक्ष्म जीवांचे महत्त्व समोर आले आहे. लद्दाखमधील कठीण परिस्थितीतही जीवन टिकून राहू शकते, हे या शोधामुळे स्पष्ट झाले आहे.
या संशोधनामुळे भविष्यातील अंतराळ संशोधनाला मोठी दिशा मिळाली आहे. मंगळ ग्रहावरील वातावरण आणि लद्दाखमधील वातावरणात मोठे साधर्म्य आहे. त्यामुळे लद्दाखमधील हा शोध मंगळावर जीवन शोधण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या संशोधनाच्या आधारे इस्रोसारख्या संस्था भविष्यात मंगळावर होणाऱ्या संशोधनासाठी नव्या पद्धती अवलंबतील. यामुळे मंगळावर जीवन असण्याची शक्यता अधिक दृढ होऊन अंतराळ संशोधनात एक नवा टप्पा येण्याची शक्यता आहे.
लद्दाखमधील हा शोध खऱ्या अर्थाने अंतराळ संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.