Scrappage Policy : जुन्या वाहनांना स्क्रॅप करण्यासाठी आता मिळणार अधिक मोबदला? नव्या पॉलिसीवर विचार सुरू - रिपोर्ट

India Scrappage Policy : कित्येक कार मालक हे अजूनही आपली जुनी गाडी स्क्रॅप करण्याऐवजी ती ग्रामीण भागात विकण्याला पसंती देत आहेत.
Scrappage Policy
Scrappage PolicyeSakal
Updated on

New Scrappage Policy India : 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांना स्क्रॅप करण्यास सरकार सांगत असतं. या बदल्यात वाहन मालकांना काही फायदे देण्याची घोषणाही सरकारने पूर्वी केली आहे. मात्र आता या फायद्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आपल्या स्क्रॅपेज पॉलिसीमध्ये बदल करणार असल्याचं वृत्त मिंटने प्रसिद्ध केलं आहे.

लोकांनी आपल्या जुन्या गाड्या स्क्रॅप करण्यासाठी स्वतःहून पुढे यावं यासाठी आता त्यांना अधिक फायदे देण्यात येणार आहेत. यासाठीची नवी पॉलिसी ही मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात लागू केली जाऊ शकते, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. (Scrappage Policy India)

सध्या काय मिळतात फायदे?

सध्याच्या स्क्रॅपेज पॉलिसीनुसार आपली वाहने स्क्रॅप करणाऱ्या मालकांना राज्य सरकार आणि कार उत्पादकांकडून काही बेनिफिट्स देण्यात येतात. यामध्ये नवीन गाडी घेताना काही डिस्काउंट देणे असा पर्याय उपलब्ध आहे. 2021 साली प्रस्तावित करण्यात आलेल्या या पॉलिसीमुळे 10 हजार कोटींची गुंतवणूक होईल आणि 35 हजार नोकऱ्या तयार होतील अशी आशा होती. मात्र, हे सत्यात उतरलं नाही.

Scrappage Policy
Govt Earnings : भंगारातून केंद्राने कमावले तब्बल १,१६३ कोटी रुपये; अहवालात माहिती समोर

कार विकण्याला पसंती

कित्येक कार मालक हे अजूनही आपली जुनी गाडी स्क्रॅप करण्याऐवजी ती ग्रामीण भागात विकण्याला पसंती देत आहेत. सरकारकडून गाडी स्क्रॅप करण्याच्या बदल्यात मिळणारे फायदे हे अगदीच कमी असल्यामुळे हे होत असल्याचं मत एका सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केलं. यामुळेच आता नवीन पॉलिसीमध्ये हे फायदे वाढवण्याचा विचार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.