Car Purchasing Tips : कार खरेदी करताय? मग डिलरला नक्की विचारा या ७ गोष्टी

समोरचा व्यक्ती निगोसिएशन करण्यात मास्टर आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपणही असेच मास्टर व्हावे अशी
Car Purchasing Tips
Car Purchasing Tipsesakal
Updated on

Car Purchasing Tips : आपल्या घरी कार असवी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं त्यामुळे कार विकत घेतांना लोकं फार विचार करतात, अर्थात कार ही अशी गोष्ट आहे जिची गुंतवणूक योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते.

अशात कारच्या किमतीची निगोशिएट करणे हे एक कौशल्य आहे जे कोणीही शिकू शकते आणि हे असे एक कौशल्य आहे जे तुम्ही नवीन, वापरलेली, वैयक्तिकरित्या किंवा डीलरकडून खरेदी करत असाल तरीही ते तुमचे शेकडो रुपयांची बचत करु शकते.

समोरचा व्यक्ती निगोसिएशन करण्यात मास्टर आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपणही असेच मास्टर व्हावे अशी एक इच्छा मनी बाळगतो, गंमत म्हणजे हे कौशल्य तुम्हीही आत्मसात करु शकतात. यासाठी तुम्हाला या काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

Car Purchasing Tips
Car Craze : मारुतीच्या या हॅचबॅक कारची बाजारात चांगलीच क्रेज, ही कार लोकांना एवढी का आवडते? वाचा फिचर

१. आधी संशोधन करा आणि मगच आपलं बजेट ठरवा

तुमच्यासाठी कोणते मॉडेल योग्य आहे हे ठरवून कार खरेदी करणे सुरु करा. तुम्हाला आवश्यक असलेल्या कारचे फिचर्स त्यात आहेत का हे आधी जाणून घ्या. प्रॅक्टिकली विचार करुन तुमचा निर्णय घ्या. तुमची लाइफस्टाईल सुचवते की तुमच्या गरजा कशाशी जुळतात. भविष्याचाही विचार करा आणि मगच आपलं बजेट ठरवा.

Car Purchasing Tips
Car Selling Tips : कार विकण्याचा विचार करताय? कशी मिळवाल Best Resale Price

२. कारच्या किंमतीबद्दल नीट चौकशी करा

नुसत्या एकाच डिलरशी बोलून कारची किंमत ठरवून बसू नका. चार ठिकाणी चौकशी करुन मगच निर्णय घ्या, शक्य असेल तर त्याच गाडीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी असलेली किंमत बघून या, मान्य आहे तुमचा जरा वेळ जाईल यात पण पैसे खर्च होण्यापेक्षा थोडा वेळ वायाला गेला तरी चालेल.

शिवाय ऑनलाइन सुद्धा अशा काही वेबसाइट आहेत जिथे तुम्हाला या कारच्या किमती सापडतील तिथून शोधून नीट चौकशी करा.

Car Purchasing Tips
Car Buying Tips : कार घेण्याआधी तज्ज्ञांनी सांगितलेले हे प्रश्न डिलरला नक्की विचारा?

३. डिलरच्या खेळात फसू नका

ज्याला आपली कार विकायचीच आहे तो तुमच्याशी गोड गोड बोलून आपलं काम काढूनच घेईल पण त्याच्याशी बोलतांना व्यवहारी रहा काहीही झालं तरी त्यांच्याशी बोलतांना आपली निगेटिव्ह बाजू त्यांना कळू देऊ नका.

Car Purchasing Tips
Car AC Problems : गाडीतला AC लवकर थंड होत नाही? फक्त एक ट्रिक सोडवेल प्रॉब्लेम...

४. टेस्ट ड्राइव घ्या

जर तुमचं ठरलं आहे की कोणती गाडी घेयची आहे तर पुढचा कोणताही व्यवहार करण्याआधी गाडीची टेस्ट ड्राइव घ्या, असं असलं की तुम्हाला गाडी चालवता येत नाही तर ज्यांना येते आणि त्यातलं व्यवस्थित कळतं अशा एखाद्या माणसाला सोबत घेऊन जा आणि गाडी चालवायला लावा.

अगदी थोडी रॅश ड्रायविंग सुद्धा करुन बघा. गाडीत कोणता आवाज तर येत नाहीये ना? खिडक्यांच्या काचा, टायर पोझिशन बाकीही बारकावे जाणून घेऊन तपासून बघा.

Car Purchasing Tips
Car Care Tips: बोंबला! कारमध्ये पेट्रोलच्या जागी चुकून भरलंय डिजेल? आता काय करायचं!

५. शोरुम मधून गाडी तपासून आणा

गाडी फर्स्ट हँड असो किंवा सेकंड हँड तिचे सगळे फिचर्स शोरुममधून तपासून आणा. हल्ली आपण अगदी मॉनिटरवर सुद्धा गाडीचे फिचर्स चेक करु शकतो ते चेक करुन घ्या.

तुम्हाला लोकांनी संशयी म्हटलं तरी चालेल पण तुम्ही आपल्या कष्टाचा पैसा गाडीसाठी खर्च करता आहात त्यावर सतत खर्च करणं नको असेल तर आधीच व्यवस्थित तपासणी करुन घ्या.

Car Purchasing Tips
Electric Car : ही असेल देशातली सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, टाटा नेक्सॉन EV ला ही टाकेल मागे

६. डिल नेहमी तुमच्या बाजूने ठेवा

लक्षात ठेवा, जितकी तुम्हाला कार खरेदी करण्याची गरज आहे तितकीच समोरच्यालाही ती विकण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्ही पडकी बाजू घेण्याची गरज नाहीये, अर्थात अरेरावी करण्याची गरज नाहीये पण आपला मुद्दा व्यवस्थित मांडत डिल आपल्या बाजूने ठेवा.

Car Purchasing Tips
Safest Cars In India : 5 स्टार रेटिंगसह येणाऱ्या या 5 कार करतील तुमचा प्रवास सुखकर

७. व्यवहार कसा करायचा हे ठरवा

अनेकदा डिलर कॅशमध्ये पेमेंट अपेक्षित ठेवतात, ठिके एकार्थी तुम्हालाही त्यासाठी व्याज भराव लागणार नाही पण जर तुम्ही पेमेंट केलं आणि ऐनवेळी डिलरने तुम्ही पैसेच दिले नाही असं म्हटलं तर? याची खात्री काय?

यासाठी आपल्या नावावर गाडी होईपर्यंत पूर्ण पैसे त्या डिलरला देऊ नका आणि प्रत्येका टप्प्यात पैसे देतांना तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या व्यवहारात दोघांच्या बाजूने एका माणसाला उभं करा जो याचा साक्षीदार असेल शिवाय स्टॅम्प पेपरवरती व्यवस्थित लिहून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.