China Rocket Boy : आकाशात जाण्याचं स्वप्न पाहणारा 11 वर्षाचा 'रॉकेट बॉय'! 600 ओळींचा कोड लिहून बनवला रॉकेट

Hongsen Rocket Boy Trending : होंगसेनला अवकाशाची आणि रॉकेटची आवड वयाच्या चौथ्या वर्षीच लागली. बालवाडीमध्ये असतानाच त्याने ऑनलाइन प्रोग्रामिंगचा कोर्स सुरू केला.
11 Year Old Chinese Boy Yan Hongsen's Rocket Building Adventure
11 Year Old Chinese Boy Yan Hongsen's Rocket Building Adventureesakal
Updated on

China Rocket Boy : चीनमध्ये रॉकेटबॉय म्हणून प्रसिद्ध झालेला 11 वर्षीय होंगसेन हा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एवढ्या कमी वयात त्याने स्वतःहूनच प्रोग्रामिंग, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र शिकून तब्बल 600 ओळींचा कोड लिहून एक रॉकेट तयार केले आहे.

होंगसेनला अवकाशाची आणि रॉकेटची आवड वयाच्या चौथ्या वर्षीच लागली. त्यावेळी त्याने एका रॉकेट लॉन्च केंद्राला भेट दिली होती. या भेटीनंतर त्याच्या मनात रॉकेटबद्दलची कुतुहल इतकी वाढली की, बालवाडीमध्ये असतानाच त्याने ऑनलाइन प्रोग्रामिंगचा कोर्स सुरू केला. पुस्तके, ऑनलाइन व्हिडीओ आणि अंतराळाच्या शौकीनांच्या फोरमच्या मदतीने त्याने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रसारखे अवघड विषयही स्वतःच शिकून घेतले.

11 Year Old Chinese Boy Yan Hongsen's Rocket Building Adventure
Ladakh Discovery : पृथ्वीसह 'या' ग्रहावर मनुष्य जीवन शक्य! लडाखमध्ये सापडलेल्या अनोख्या खजिण्यानं उलगडलं रहस्य
Young Rocket Scientist 11-Year-Old's Journey to Space
Young Rocket Scientist 11-Year-Old's Journey to Spaceesakal

होंगसेनच्या उत्सुकतेला त्याच्या पालकांनीही साथ दिली. त्यांनी तर आपले हॉलचेच एका रॉकेट संशोधन केंद्रात रूपांतरित केले.ऑगस्ट 2022 पासून होंगसेनने आपले स्वतःचे पहिले रॉकेट बनवायला सुरुवात केली. जून 2023 मध्ये त्याने हे रॉकेट लॉन्च केले, मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्यात बिघाड झाली आणि ते कोसळले.

पण होंगसेनने हार मानली नाही. त्याने त्या रॉकेटचे तुकडे जमा करून त्यातील चुका काढल्या. “नायट्रोसेल्युलोजचा अपेक्षेप्रमाणे स्फोट झाला नाही. स्प्रिंग आणि लिथियम बॅटरीही खराब झाल्यात. कदाचित रॉकेटच्या बॉडीच्या जोडणीमध्येही काही अडचण असू शकते,” असे त्याने सांगितले.

11 Year Old Chinese Boy Yan Hongsen's Rocket Building Adventure
Olympics in Space : सुनीता विल्यम्स अंतराळातून ऑलिम्पिक सोहळ्यात झाली सहभागी, खेळले 'हे' गेम्स, व्हायरल व्हिडिओ पाहाच

होंगसेनचे हे धाडस पाहून त्याचे वडील म्हणाले, “माझ्यासाठी हे रॉकेट जरी कोसळले असले तरी त्याची पहिली उड्डाण यशस्वीच होती. मी तर खूप उत्साहित झालो.”

आता होंगसेन आपले दुसरे रॉकेट अधिक सुधारित करण्यात व्यस्त आहे. त्याने आपल्या नवीनतम रॉकेटच्या फ्लाइट कंट्रोल सिस्टमसाठी 600 पेक्षा जास्त ओळींचा कोड लिहिला आहे. त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, होंगसेनचा भविष्यातील ध्येय चीनच्या सात सर्वोत्तम नागरी संरक्षण संस्थानांपैकी एकात सामील होणे आणि मोठा झाल्यावर अंतराळ संशोधनासाठी चीनसाठी खरा रॉकेट बनवणे असे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.