Vedanta Foxconn : चर्चेत आलेलं सेमीकंडक्टर नेमकं काय? कारच्या कोणत्या भागात वापरतात?

सेमीकंडक्टर विषयी आजकाल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये बरीच चर्चा आहे. कारसाठी सेमीकंडक्टर फार महत्वपूर्ण आहे. यामुळेच कार निर्माण कंपन्या आपल्या कार्समध्ये हायटेक फिचर्स देऊ शकतात.
Semiconductor
Semiconductoresakal
Updated on

Semiconductor : सध्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री बऱ्याच अडचणींमधून जात आहे. याचे कारण म्हणजे सेमीकंडक्टर्सची कमतरता. आजकालच्या कार्समध्ये बरेच हायटेक फीचर्स दिले जातात. यासाठी सेमीकंडक्टर फार आवश्यक असते. कोविड काळात सेमीकंडक्टरची निर्मिती कमी झाली. त्यामुळे त्याचा आता तुतवडा जाणवत आहे. यामुळे ऑटो इंडस्ट्री आपल्या पूर्ण क्षमतेने काम करू शकत नसल्याने प्रॉडक्शनचा स्पीड कमी झाला आहे. म्हणूनच महिंद्रा आणि मारूती सुजुकीने प्रॉडक्शन कमी केले आहे.

Semiconductor
ऑटोमोबाईल असोसिएशन बंदमध्ये सहभागी होणार नाही;पाहा व्हिडिओ

काय असते सेमीकंडक्टर

सेमीकंडक्टर म्हणजे अर्धचालक असा होतो. याचा वापर करंट नियंत्रित करण्यासाठी केला जातो. सेमीकंडक्टर सिलिकॉनपासून बनवलेले असून ते चिप फॉर्ममध्ये असते. बाजारात असलेल्या प्रत्येक कारला सेमीकंडक्टर वापरलेच जाते. याने कारचे करंट नियंत्रित केले जात असल्याने याशिवाय कारचे हायटेक फिचर्स चालूच शकत नाही. कारला चालता फिरता कंप्यूटर बनवण्यात सेमीकंडक्टरचा वाटा सर्वात मोठा आहे.

Semiconductor
ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टेक लीडर होण्यास MG Motors India सज्ज; Jio सोबत करार

या पार्ट्समध्ये वापरतात

हेड्स अप डिस्प्ले, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग एड, सेन्सर्स, सेलफोन आणि कम्युनिकेशन इंटिग्रेशनसह उच्च दक्षतावाले इंजिनच्या एलिमेंट्समध्ये सेमीकंडक्टरचा वापर होतो. याशिवाय ड्रायव्हर असिस्टंस, पार्किंगसाठी रियर कॅमेरा, सेंसर कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ॲडप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन चेंज असिस्ट, एयरबॅग व इमर्ज ब्रेकिंगमध्ये सेमीकंडक्टरची आवश्याकता असते. या सर्व फिचर्सला हायटेक बनवण्यात सेमीकंडक्टर महत्वाचा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.