Serum Institute:सीरमची देशाला आणखी एक संजीवनी! कोरोनानंतर डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवण्यात यश, लवकरच येणार बाजारात

डेंग्यू आणि मलेरियाची लस तयार करण्यात सीरम इन्स्टिट्युटला यश, वर्षाच्या शेवटी लस बाजारात उपलब्ध होणार.
Serum Institute of India
Serum Institute of IndiaSakal
Updated on

Dengue Vaccine: जगभरात जेव्हा कोरोनाने हाहाकार माजवला होता, तेव्हा भारताच्या सीरम इन्स्टिट्युटने कोरोनाची लस निर्माण करुन जगाला संजीवनी दिली होती. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात आली होती. आता सीरम इन्स्टिट्युटने आणखी एक अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवली आहे.

सीरमने डेंग्यू आणि मलेरिया या रोगांवर लस तयार करण्यात यश मिळवलं आहे. वर्षभरात ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. सीरम इस्टिट्युटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आणि मलेरिया रोगांचा लाखो लोकांना प्रादुर्भाव होतो, डेंग्यूमुळे काही लोक दगावलेही जातात. त्यामुळे अनेक वर्षापासून सीरम इस्टिट्युटचे शास्त्रज्ञ या रोगांवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत होते.(Latest Marathi News)

या शास्त्रज्ञांना लस तयार करण्यात आता यश आलंय.सीरमचे शास्त्रज्ञ डेंग्यू आणि मलेरिया बरोबरचं कर्करोगावरही संशोधन करत आहेत. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर लस शोधून काढण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

Serum Institute of India
Jitendra Awhad : मुंबईला कमकुवत करण्याचं केंद्र सरकारच धोरण; आव्हाड यांची जोरदार टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.