SIM Card Swap Fraud : मोबाईल सिम कार्ड स्वॅपिंग म्हणजे मोबाईल सिम कार्ड बदलणे. ही फसवणूक करण्याची एक नवीन पद्धत असून वापरकर्त्यांना माहिती होण्याआधी तर त्यांचे बँक खाते रिकामे केले जाते. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत..
या फसवणुकीअंतर्गत फसवणूक करणारे मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरच्या मदतीने त्याच क्रमांकावर नवीन सिमकार्ड देतात. यानंतर, मोबाईल नंबरवर otp द्वारे, तुम्हाला तुमचे बँक खाते आणि त्याच्याशी संबंधित सर्व माहिती मिळते.
कसा होतो हा सिम कार्ड फ्रॉड
फसवणूक करणारे फिशिंग, विशिंग, स्मिशिंग इत्यादी सोशल इंजिनिअरिंग तंत्रांद्वारे एखाद्या व्यक्तीचे बँक खात्याचे डिटेल्स आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर मिळवतात. यानंतर हॅकर मूळ सिम ब्लॉक करण्यासाठी बनावट आयडी प्रूफसह मोबाइल ऑपरेटरच्या रिटेल आउटलेटवर जातो आणि मूळ सिम ब्लॉक करतो. यानंतर, व्हेरिफिकेशन होताच ग्राहकाचे सिम ब्लॉक केले जाते. आणि बनावट युजर नवीन सिम कार्ड वापरु लागतात. आता हे ठग नवीन सिम वापरून फसवणूक आणि वापरकर्त्यांच्या खात्यातून व्यवहार करण्यास सुरुवात करतात.
या फ्रॉडपासून सुरक्षित कसे राहाल?
1. फिशिंग, विशिंग, स्मिशिंग यांसारख्या सोशल इंजिनिअरिंग तंत्रांपासून सावध रहा.
2. जर तुमचा नंबर ब्लॉकझाला, विशेषतः जर बँक खाते त्या नंबरशी जोडलेली असतील, तर लगेच तुमच्या मोबाईल ऑपरेटरशी संपर्क साधा.
3. फसवणूक टाळण्यासाठी बँक खात्याचा पासवर्ड त्वरित बदला.
4. नियमित एसएमएस अलर्टसह ईमेल अलर्ट चालू ठेवा. अशा परिस्थितीत जर तुमच्या नकळत कोणतीही रक्कम काढली गेली तर तुम्हाला ईमेलवर अलर्ट दिला जातो.
५. तुमचे बँक खाते स्टेटमेंट नेहमी वेळेवर तपासत रहा.
6. फसवणूक झाल्यास, फोन बँकिंगशी त्वरित संपर्क साधा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.