SIM Port : जर तुम्ही सिम पोर्ट करण्याचा विचार करत असाल तर नवीन सिमकार्ड आता थेट तुमच्या घरी येईल. जर तुम्हाला रिलायन्स जिओमध्ये पोर्ट करायचं असेल तर तुम्ही सिमच्या होम डिलिव्हरीचा फायदा घेऊ शकता. फोनमध्ये चांगलं नेटवर्क नसेल तर ग्राहकांना सिम पोर्ट करण्याची सुविधा मिळते.
असे अनेक लोक आहेत जे मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) चा फायदा घेत एक टेलिकॉम कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीचे सिम घेतात. ही प्रक्रिया देखील खूप सोपी आहे, ज्यामुळे सामान्य ग्राहकांना खूप फायदा होतो. थोडक्यात ही सिम पोर्ट करण्याची बाब आहे, पण पोर्ट केल्यानंतर तुम्हाला घरबसल्या नवीन सिमकार्ड मिळतं हे माहीत आहे का? होय, देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ही सुविधा देत आहे.
मोबाईल नंबर पोर्ट केल्यानंतर, सर्वात मोठी समस्या नवीन सिमकार्डची येते. सहसा लोक नवीन सिम घेण्यासाठी टेलिकॉम कंपनीच्या अधिकृत स्टोअरमध्ये जातात. आता तुम्हाला एवढा त्रास घेण्याची गरज नाही, कारण रिलायन्स जिओ नवीन सिम थेट तुमच्या घरी पोहोचवेल. यासाठी तुम्हाला थोडेसे काम करावे लागेल.
आधी मोबाईल नंबर कसा पोर्ट केला जातो हे जाणून घ्या.
फोन नंबर पोर्ट करण्यासाठी, तुम्हाला पोर्ट करायचा असलेल्या नंबरवरून एसएमएस पाठवावा लागेल.आता मेसेजमध्ये 'PORT' <10 अंकी मोबाईल नंबर> लिहा आणि 1900 वर पाठवा.एसएमएस पाठवल्यानंतर एक पोर्टिंग कोड येईल. तो सांभाळून ठेवावा लागेल.युनिक पोर्टिंग कोड मिळाल्यानंतर, सिमच्या होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर द्या.
सिम बुक करण्यासाठी रिलायन्स जिओच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला सिम पोर्ट करण्यासाठी 3 स्टेप्स दिसतील. याच्या खाली पोर्ट टू जिओचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.इथे तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाका. यानंतर एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर पत्ता टाकून सिम घरच्या पत्त्यावर मागवा. कंपनी तुमच्या दिलेल्या पत्त्यावर Jio चे नवीन सिम पाठवून देईल. सिमची होम डिलिव्हरी पूर्णपणे मोफत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.