इंडस्ट्रिअल कार्बनपासून इको-फ्रेंडली टाइल्सची निर्मिती!

इंडस्ट्रिअल कार्बनपासून इको-फ्रेंडली टाइल्सची निर्मिती! 'सिंहगड'च्या विद्यार्थिनींचे यश
इंडस्ट्रिअल कार्बनपासून इको-फ्रेंडली टाइल्सची निर्मिती!
इंडस्ट्रिअल कार्बनपासून इको-फ्रेंडली टाइल्सची निर्मिती!Sakal
Updated on
Summary

केगाव येथील सिंहगड सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थिनींनी कारखान्यातील कार्बनचा वापर करून इको-फ्रेंडली टाइल्सची निर्मिती केली आहे.

सोलापूर : केगाव येथील सिंहगड सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजमधील (Sinhagad Civil Engineering College) ऋतुजा विद्यानंद बाबर, स्नेहा चंद्रकांत भोसले, वैष्णवी सिद्धेश्वर बिराजदार आणि सायली संतोष उबाळे या चार विद्यार्थिनींनी हवेतील वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी कारखान्यातील कार्बनचा (Carbon) वापर करून इको-फ्रेंडली टाइल्सची (Eco-friendly tiles) निर्मिती केली. भारतातील वाढते औद्योगिकरण, औद्योगिक प्रकल्प आणि औद्योगिक क्षेत्र निर्मितीमुळे होणाऱ्या कार्बन प्रदूषणातून बाहेर पडणारे कार्बनचे अतिसूक्ष्म कण ही दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आहे. वातावरणात दिवसेंदिवस वाढत जाणारे हवा प्रदूषण आणि त्यासाठी मुख्यत्वे कारणीभूत असणारे औद्योगिकरण यावर उपाय आणि परिणामी कमी खर्चामध्ये टाइल्सची निर्मिती करून सिंहगड स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी यशस्वीपणे प्रकल्प पूर्ण केला आहे.

इंडस्ट्रिअल कार्बनपासून इको-फ्रेंडली टाइल्सची निर्मिती!
'PSI'ची वाढणार वयोमर्यादा? बुधवारी होणार कॅबिनेटमध्ये निर्णय

या प्रकल्प निर्मितीदरम्यान त्यांना 81 पेक्षाही जास्त विविध प्रमाणात तयार केलेल्या टाइल्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घ्याव्या लागल्या. त्यातल्या बहुतांशी टाइल्स या अयशस्वी होत होत्या, तरीही सातत्याने प्रयत्न करून या विद्यार्थिनींनी त्यांच्या ज्ञानाच्या, कुशलतेच्या जोरावर आठ महिने अथक प्रयत्न करून अंतिम टप्प्यामध्ये यशस्वी प्रमाण शोधून काढले. औद्योगिकरणामुळे वाढत जाणारे हवेतील प्रदूषण हे घातक आहे. त्यातील कार्बनचे अतिसूक्ष्म कण फिल्टर करून व इतर मार्गाने गोळा करून ते हवेमध्ये न जाऊ देता गोळा केलेले सूक्ष्म कण या विद्यार्थिनींनी टाइल्स (फरशी) तयार करण्यासाठी वापरले आहेत. या कार्बनसोबत त्यांनी विविध अभियांत्रिकी पदार्थ, सिमेंट, खडी, इतर पदार्थ योग्य प्रमाणात मिश्रित करून यशस्वीपणे टाइल्सची निर्मिती केली आहे. अंततः त्यांना मिळालेल्या उपायातून असे सिद्ध झाले आहे, की तयार केलेल्या कार्बन टाइल्स या इतर टाइल्सपेक्षा कमी खर्चामध्ये तयार होत आहेत आणि सोबतच तो महत्त्वाचा निष्कर्ष त्यांनी शोधून काढला की, या तयार झालेल्या कार्बन टाईल्स बाजारामध्ये उपलब्ध पारंपरिक टाईल्सपेक्षाही जास्त मजबूत आणि टणक इको-फ्रेंडली आहेत.

ही सिद्धता पडताळून पाहण्यासाठी त्यांनी सिंहगडच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात उपलब्ध असणाऱ्या प्रयोगशाळेचा वापर केला आणि सोबतच त्यांनी या टाइल्स खुल्या जागेमध्ये बसवून त्यावरून अवजड वाहनांचीही चाचणी घेतली आणि ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली. हा पूर्ण प्रकल्प समाजासाठी अतिशय उपयोगी आहे, तसेच कमी खर्चामध्ये तयार होत असल्यामुळे हा इको-फ्रेंडली आणि इकॉनॉमिक असल्याने विद्यार्थिनींनी अथक परिश्रमानंतर व सातत्यपूर्ण अभ्यास करून यशस्वीपणे हा प्रकल्प पूर्ण केला.

या टाइल्सच्या गुणवत्ता तपासणीसाठी कमी अवजड वाहनांच्या मदतीने चाचणी घेण्यात आली. या गुणवत्तापूर्ण तयार केलेल्या टाइल्स या घराच्या अंगणात, पार्किंग स्लॉट, हॉस्पिटल, व्यावसायिक इमारती, पेट्रोल पंप, ग्रामपंचायत बाग-बगीचे, मंदिरे व लगतचा प्रदेश, रेल्वे प्लेटफॉर्म, एसटी स्टॅंड, फूटपाथ यांसारख्या इतरही ठिकाणी कोणत्याही दुष्परिणामाशिवाय कमी खर्चात यशस्वीपणे बसवता येऊ शकतात.

या शोध प्रकल्पावर या चारही विद्यार्थिनींनी एक आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये पेपर प्रकाशित केलेला आहे व पुढील पेपरची त्यांची तयारी चालू आहे. त्याकरिता त्यांना स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांकडून मार्गदर्शन होत आहे. या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपसाठीही पॉझिटिव्ह उपयोग होऊ शकतो, असे मत प्रा. प्रदीप तपकिरे यांनी व्यक्त केले.

इंडस्ट्रिअल कार्बनपासून इको-फ्रेंडली टाइल्सची निर्मिती!
B.Tech अन्‌ MBA उत्तीर्णांसाठी ITI लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी!

या प्रकल्पासाठी प्रकल्प मार्गदर्शक म्हणून प्रा. सतीश आवारे व सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा. प्रदीप तपकिरे यांचे सहकार्य लाभले. ही इको फ्रेंडली टाइल्स फरशीची निर्मिती म्हणजे बांधकाम क्षेत्राकरिता कौतुकास्पद व अभ्यासपूर्ण एक पर्वणीच आहे, असे मत सिंहगडचे उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे (शैक्षणिक), डॉ. शेखर जगदे (प्रशासन) यांनी केले. टाइल्सच्या गुणवत्ता प्रात्यक्षित चाचणीप्रसंगी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या प्रकल्पाचे संपूर्ण महाविद्यालयातून कौतुक होत आहे. या यशाबद्दल सर्व विभागातील विभाग प्रमुख व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार सचिन जोशी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.