National Science Day : सी.व्ही. रामन यांना पडलेला 'तो' प्रश्न त्यांना नोबेलपर्यंत घेऊन गेला

CV Raman : रामन यांच्या याच संशोधनाप्रित्यर्थ २८ फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा शोध रामन इफेक्ट म्हणून ओळखला जातो व त्याला नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
National Science Day
National Science Day eSakal
Updated on

CV Raman Nobel Story : लांब पल्ल्याच्या प्रवासात आपण काय करतो ? झोप काढतो, वाचतो, फोनवर टाइमपास करतो. पण आपल्या देशात अशी एक व्यक्ती होती जी यापैकी काहीच करतो नव्हती.

इंग्लंडमधून भारतात जहाजाने परतत असताना ही व्यक्ती आकाश निरीक्षण करत होती. जगात एवढे रंग असतात मग आकाश निळेच का दिसते ? हा ऐकायला अगदी सर्वसाधारण वाटणारा प्रश्न त्या व्यक्तीला पडला आणि त्याने थेट नोबेलवरच आपले आणि देशाचे नाव कोरले.

ती व्यक्ती होती महान वैज्ञानिक भारतरत्न सर सी.व्ही. रामन. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ साली तत्कालीन मद्रास प्रांतात झाला. आकाशाच्या निळ्या रंगाबद्दल असलेल्या कुतूहलामुळे त्यांनी प्रकाशाचे विकीरण म्हणजेच स्कॅटरिंगविषयी संशोधन केले. (why national science day is celebrated)

रामन यांच्या याच संशोधनाप्रित्यर्थ २८ फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा शोध रामन इफेक्ट म्हणून ओळखला जातो व त्याला नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

अवघ्या सोळाव्या वर्षी रामन यांनी भौतिकशास्त्रात प्रथम क्रमांकासह पदवी मिळवली आणि नंतर एमएससी पूर्ण केले. १९ वर्षांचे असताना त्यांनी इंडियन फायनान्स सर्व्हिस जॉईन केली आणि कोलकात्याला असिस्टंट अकाउंट जनरल म्हणून काम सुरु केले. (Who is CV Raman)

त्यावेळी ते इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिवेशन सायन्स या संशोधनासंबंधी काम करणाऱ्या संस्थेच्या संपर्कात आले. १९१७ साली त्यांनी सरकारी नोकरी सोडली व कोलकाता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

विद्यापीठातर्फे त्यांना उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवण्यात आले होते. तेथून परतताना त्यांना आकाशाविषयी कुतूहल निर्माण झाले आणि संशोधनाला दिशा मिळाली.

National Science Day
National Science Day : संपूर्ण जगासाठी आदर्श ठरणाऱ्या 'या' आहेत भारताच्या महिला सायंटिस्ट...

रामन यांचे संशोधन काय सांगते ?

जेव्हा प्रकाशाचे किरण एखाद्या अणूवर पडतात तेव्हा त्याचे विकिरण होते. म्हणजे तो प्रकाश त्या पदार्थातून बाहेर पडून इतरत्र पसरतो. वातावरणात अनेक सूक्ष्मकण अस्तित्त्वात असतात.

त्या सुक्ष्मकणांवर प्रकाशाचे किरण पडल्यास कमी तरंगलांबी असणाऱ्या निळ्या रंगाचे स्कॅटरिंग मोठ्या प्रमाणावर होते आणि ते जेव्हा आपल्या डोळ्यांवर पडतात तेव्हा आपल्याला आकाश निळ्या रंगाचे भासते.

आपल्याला ज्या-ज्या वस्तूंचे रंग वेगवेगळे दिसतात त्यावेळी त्या वस्तूमधून संबंधित प्रकाशाच्या कमी तरंगलांबीचे जास्तीत जास्त विकिरण होत असते.

२८ फेब्रुवारी १९२८ साली त्यांनी 'रामन इफेक्ट'चा (Raman Effect) शोधनिबंध जगासमोर प्रकाशित केला. १९३० साली त्यांच्या शोधाला जागतिक मान्यता मिळाली आणि त्यांना मानाचा नोबेल पुरस्कार मिळाला.

रामन इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ भारतात १९८७ सालापासून दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. १९५४ साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()