लॉंच होताच कार ठरली हीट! एकाच महिन्यात 10 हजारांहून जास्त बुकिंग

skoda slavia premium sedan receives more than 10000 bookings within a month of launch
skoda slavia premium sedan receives more than 10000 bookings within a month of launch
Updated on

2022 Skoda Slavia प्रीमियम सेडान या कारला भारतात लॉन्च केल्याच्या एका महिन्यात ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. Skoda Auto India ने जाहीर केले आहे की सेडानने पहिल्या चार आठवड्यात 10,000 पेक्षा जास्त बुकिंग मिळवले आहेत. स्कोडा स्लाव्हिया, जी 1.0-लीटर आणि 1.5-लीटर TSI पेट्रोल इंजिन असलेल्या दोन पॉवरट्रेनमध्ये ऑफर केली जाते. 1.0-लिटर इंजिन व्हेरिएंट 10.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आले आगे. अधिक शक्तिशाली 1.5-लिटर व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 16.19 लाख रुपयांपासून सुरू होते.

Skoda Slavia चे व्हेरिएंट आणि इंजिन ऑप्शन्स

ही कार चेक कार निर्मातीच्या MQB प्लॅटफॉर्मवर आधारित आहे जे Kushaq SUV मध्ये देखील वापरले जाते. स्कोडा स्लाव्हियाचे 1.0-लिटर TSI पेट्रोल इंजिन Active (एक्टिव), Ambition (एम्बिशन) आणि Style (स्टाइल) या तिन्ही ट्रिममध्ये स्टँडर्ड म्हणून उपलब्ध आहे. 1.5-लिटर स्लाव्हिया केवळ टॉप स्टाइल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

इंजिन आणि पॉवर

1.0-लिटर इंजिन

स्कोडा स्लाव्हिया सेडान कार 1.0-लिटर इंजिन 113 bhp पॉवर आणि 175 Nm टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल आणि एटी दोन्ही युनिट्स चालू असताना, ते सुमारे 10.1 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग मिळवण्याचा दावा करते. एटी मॉडेलला दोन ड्राईव्ह मोड देखील मिळतात - नॉर्मल आणि स्पोर्ट.

1.5-लिटर इंजिन

अधिक शक्तिशाली स्कोडा स्लाव्हियाचे 1.5-लिटर TSI इंजिन 150 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. यामुळे या क्षणी देशातील सर्वात शक्तिशाली पेट्रोल मध्यम आकाराची सेडान आहे. स्कोडाचा दावा आहे की ही कार 10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. यासोबतच ही कार 18 kmpl पेक्षा किंचित जास्त मायलेज देते.

skoda slavia premium sedan receives more than 10000 bookings within a month of launch
टोयोटा इनोव्हा येतेय इलेक्ट्रिक अवतारात; लवकरच होणार लॉन्च

लूक आणि डिझाईन

आकाराच्या बाबतीत, स्लाव्हिया त्याच्या सेगमेंटमध्ये थेट स्पर्धा करणाऱ्या इतर गाड्यांच्या तुलनेत लांब, रुंद आणि उत्तम ग्राउंड क्लीयरन्स आणि व्हीलबेससह येते. लांबीमध्ये, ती होंडा सिटीपेक्षा थोडी लहान आहे. स्लाव्हियाला स्कोडा कुशकच्या ग्रिलप्रमाणेच क्रोम सराउंडसह संपूर्ण फ्रंट ग्रिल मिळते, आणि दोन्ही बाजूला एलईडी हेड लाइट्स आणि एलईडी डीआरएल आहेत.

सेफ्टी फीचर्स

स्कोडा स्लाव्हियामध्ये सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. या सेडान कारमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. यासोबतच ABS, इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), मल्टी कोलिजन ब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, रेन आणि लाइट सेन्सर्स. यांसारखी अनेक सुरक्षा फीचर्स आहेत.

skoda slavia premium sedan receives more than 10000 bookings within a month of launch
लवकरच येतेय Mahindra ची स्वस्त इलेक्ट्रिक कार; काय असेल किंमत?

बुकिंग

Skoda Slavia सेडानचे बुकिंग देशभरातील विविध डीलरशिपवर अधिकृत लॉन्च होण्यापूर्वीच सुरू झाले होते. स्कोडा सेडान 11,000 रुपये टोकन रक्कम भरून बुक करता येते. याचे उत्पादन महाराष्ट्रातील पुण्याजवळील चाकण येथील प्लांटमध्ये केले जात आहे.

skoda slavia premium sedan receives more than 10000 bookings within a month of launch
रशियन सैन्याचे अल्पवयीन मुलींवर बलात्कार; युक्रेनच्या खासदाराचा गंभीर आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.