Skyscanner Saving Tool : उन्हाळ्यात फिरायला जायचा प्लॅन बनवताय? Skyscannerचं 'हे' टूल करेल तुमच्या बजेटचं दुप्पट सेविंग

Book flights with Skyscanner Savings Generator Tool: उन्हाळ्यात सर्वोत्तम डील मिळवण्यासाठी एवढ्या आठवडे आधी फ्लाइट्स बुक करणं योग्य
Plan Your Summer Trip with Skyscanner’s Savings Generator
Plan Your Summer Trip with Skyscanner’s Savings Generatoresakal
Updated on

Skyscanner : उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली कि सहसा लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणं प्लॅन करत असतात. मग ते ट्रेन,फ्लाईट आणि अन्य बरेच पर्याय शोधात असतात. जे अधिक बजेट फ्रेंडली असतील.मग हे ऑनलाईन एप्सवर शोध घेतात. पण बजेटच्या चिंतेमुळे अनेकदा ट्रिप बुक करणं टाळलं जातं. अशा प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

स्कायस्कॅनरने भारतीयांना परफेक्ट सुट्टीसाठी प्लॅन करण्यात मदत करणारं “बचत जनरेटर” (Savings Generator tool) टूल लॉन्च केलं आहे.या टूलच्या माध्यमातून तुम्ही बुकिंग बद्दल,स्वस्त बुकिंगच्या तारखा, ट्रिप गाईड आणि अजून बऱ्याच सुविधा वापरू शकता.

Plan Your Summer Trip with Skyscanner’s Savings Generator
Samsung-Poco 5G Phone Launch : सॅमसंग आणि पोकोचे 'हे' 5G फोन लाँच ; कोणता आहे बेस्ट? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही

जास्तीत जास्त प्रवासी करणार ट्रिप:

स्कायस्कॅनरच्या सर्वेक्षणानुसार ७८% पेक्षा जास्त भारतीय प्रवासी उन्हाळ्यात कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत आहेत. ३९% लोकांनी अजून ट्रिप बुक केलेली नाही. त्यापैकी ५१% लोकांना निश्चित तारीख ठरवता येत नाहीये तर ५०% लोकांना कोणत्या ठिकाणी जायचं ते कळत नाहीये. ४७% प्रवासी सर्वोत्तम डील शोधत असतात तर २०% लोकांना शेवटच्या क्षणी स्वस्त डील मिळण्याची वाट पाहत असतात.

भारतातून उन्हाळ्यात सर्वोत्तम डील मिळवण्यासाठी साधारणपणे ३ आणि ½ महिने आधी (१६ आठवडे) फ्लाइट्स बुक करणं योग्य असत.

स्कायस्कॅनरच्या टूलवर तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणासाठी नेमक कधी बुकिंग करायला हवं याची माहिती मिळवू शकता. अजूनही संधी आहे!

Plan Your Summer Trip with Skyscanner’s Savings Generator
World's Youngest Artist : सोशल मीडियावर फेमस झालेला चिमुकला चित्रकार पाहिलात काय? वयाच्या पहिल्या वर्षीच 'गिनीज बुक'मध्ये नोंद

जर तुम्ही आधी बुकिंग करू शकला नसाल तर चिंता करू नका. बचत जनरेटर टूलवर तुम्ही आताही स्वस्त फ्लाइट्स शोधू शकता. आता उन्हाळ्याच्या सुट्टीची तयारी करायला काय वाट पाहात आहात? स्कायस्कॅनरच्या “बचत जनरेटर” टूलची मदत घ्या आणि परफेक्ट सुट्टी एन्जॉय करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.