- डॉ. मृण्मयी मांगले
तुम्हाला आजचा विषय थोडा वेगळा वाटला असेल आणि जुनाट आजारावर काम करणाऱ्या डॉक्टरने यावर भाष्य करणं नवलाचं वाटलं असेल; पण इलेक्ट्रॉनिक उपकरणं, खासकरून मोबाईल फोनमुळे जणू एक नवा सर्वत्र फैलावलेला आजार निर्माण होत आहे. मादक पदार्थ सेवनाच्या आधीन होऊन व्यसन लागतं आणि त्यामुळे आपले सर्वसामान्य जीवन बाधित होतं; तसंच काहीसं या मोबाईलमुळे होऊ लागलं आहे.