Tech Tips : आजकालच्या धावपळीच्या जगात आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पण नेहमी घड्याळ हातात बांधून ठेवायला जमत नाही. यावर स्मार्ट रिंग हा उत्तम पर्याय आहे. हे अगदी सहज नेहमी हातात राहणारं आणि आरोग्य तपासणी करणारं अत्याधुनिक गॅझेट आहे.
फिटनेस ट्रॅकर म्हणून लोकप्रिय होत चाललेले स्मार्ट रिंग विविध आकारात येतात पण बहुतेक गोलाकार असतात. बाजारात अधिक पर्याय उपलब्ध होत असल्याने योग्य निवड करणे थोडे कठीण जाऊ शकते. पण चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला स्मार्ट रिंगबद्दल अधिक जाणून घेण्यास आणि तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम निवड करण्यासाठी मदत करणार आहोत.
स्मार्ट रिंग ही एक अत्याधुनिक अंगठी आहे जी तुमच्या आरोग्याची माहिती देते. त्यात पावले मोजणे, हृदय गती निरीक्षण, क्रीडा क्रियाकलाप ट्रॅकिंग आणि नोटिफिकेशन अलर्ट यांचा समावेश असतो. काही रिंग्स स्मार्टफोनच्या कॅमेरा शटर बटन म्हणूनही वापरता येतात.
टायटेनियमसारख्या प्रीमियम मटेरियलपासून बनवलेल्या काही रिंग्स तर काही काचेसारख्या दिसणाऱ्या असतात. शिवाय, वेगवेगळ्या रंग आणि डिझाइनमध्ये उपलब्ध असल्याने तुम्ही तुमच्या आवडीच्या कपड्यांनुसार त्यांची निवड करू शकतात. काही स्मार्ट रिंग्स सब्स्क्रिप्शन नसल्यास बोटात फक्त सजवाट आई आकर्षक रिंग म्हणूनच काम करतात. तर काही रिंग्स स्वतंत्रपणे चालतात पण त्यांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी त्यांना सुसंगत अँड्रॉइड स्मार्टफोनशी जोडावे लागते.
स्मार्ट रिंग निवडताना आकाराला खूप महत्व आहे. बऱ्याच स्मार्ट रिंग उत्पादकांकडून तुमच्या बोटात बरोबर बसणारी रिंग निवडण्यासाठी नमुना रिंग किट उपलब्ध आहेत. बॅटरी लाइफचाही विचार करा. सहसा,अधिक फीचर्स असलेल्या स्मार्ट रिंगची बॅटरी लाइफ कमी असते.
HMDO स्मार्ट रिंग: अगदी स्वस्त (रू. 5,999) परंतु हृदय गती आणि SpO2 ट्रॅकिंगसारखे फीचर्स देते.
boAt स्मार्ट्रिंग Gen-1: शरीराचे तापमान, SpO2, झोप व्यवस्थापन आणि मासिक पाळी चक्र ट्रॅक करते.
aaboRing: प्रीमियम दिसणारी आणि टिकाऊ (रू. 13,250).
Ultrahuman Ring Air: फिटनेसवर भर देणारी रिंग (रू. 28,499).
7 Ring: विशेषत: डिजिटल पेमेंटसाठी (रू. 5,577).
याव्यतिरिक्त सॅमसंगसारख्या कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वैशिष्ट्ये असलेल्या स्मार्ट रिंग्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. तुमच्या आरोग्याची आणि शैलीची काळजी घेणारी स्मार्ट रिंग निवडा आणि आरोग्याची काळजी घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.