how to improve mobile speed: मोबाईल फोन हे आपल्या प्रत्येकासाठी सध्या महत्वाचं गॅझेट ठरतंय. एकाचवेळी आपण आपल्या मोबाईलमध्ये Mobile अनेक कामं करत असतो. मोबाईलमध्ये एकाचवेळी वेगवेगळे ऍप्स सुरू असतात. याशिवाय फोटो, व्हिडीओचा भार असतो. Smart Tips How to Increase Speed of your mobile
मोबाईलवर ऑनलाईन अॅक्टिविटी करत असताना तसंच ब्राउझिंग करत असताना अनेक जंक फाइल्स Junk Files फोनमध्ये स्टोर होत राहतात. परिणामी अनेकदा मोबाईल Mobile Phone स्लो होतो. तर काही वेळा फोन हँग होऊ लागतो.
फोनमध्ये साचणाऱ्या जंक फाइल्ससोबतच कॅशे Cache आणि काही डाउनलोड कुकीजमुळे मोबाईल स्लो होत असतो. अनेकदा एखाद्या महत्वाच्या कामाच्या वेळीच मोबाईल हँग होतो आणि तुमची चिंता वाढते. यासाठीच वेळीच जर तुम्ही मोबाईलच्या सेटिंगमध्ये काही बदल केले तर मोबाईल हँग होणार नाही शिवाय तुमचा मोबाईल सुपरफास्ट काम करू लागेल.
काही स्मार्टफोनमध्ये Smart Phones स्वत:ची ट्रॅश सिस्टम असते. जिच्या मदतीने तुम्ही फोनमधील नको असलेल्या कॅशे फाईल्स आणि डाउनलोड फाईल्स डिलीट करू शकता. मात्र Android मध्ये रिसायकल बीन नसल्याने अनेक डिलीट केलेल्या फाइल्सही स्टोर होत असल्याने फोन स्लो होतो.
यासाठीच आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुमचा मोबाईळ सुपफास्ट चालेल.
हे देखिल वाचा-
Androidमध्ये फोटो ट्रॅश असं करा रिकामं
सर्वप्रथम Android स्मार्ट फोनमधील Google Photos App ओपन करा.
यात Library पर्यायावर क्लिक करा.
यानंतर Library मधील Trash या ऑप्शनवर क्लिक करा. उजव्या बाजुला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा.
इथं 'Empty Trash' चा पर्याय सिलेक्ट करा.
इथं तुम्हाला Allow वर क्लिक करायचं आहे. यामुळे तुमच्या स्मार्टफोनमधील गुगलवरील फोटो कायमचे डिलीट होतील.
अशा डिलीट करा Google Files
जर तुम्ही गुगल फाइल्स File Manager मध्ये स्टोर करत असाला तर तुम्ही इथंही ट्रॅश क्लियर करू शकता.
फोनमध्ये गुगुल अॅपची फाईल सिलेक्ट करा.
वर डाव्या बाजुला असलेल्या Hamberger Menuवर क्लिक करा.
इथं Trash पर्याय निवडल्यास तुम्हाला डिलिटेड फाइल्स दिसतील.
तुम्ही एकाच वेळी या सर्व फाईल्स सिलेक्ट करू शकता.
त्यानंतर खाली असलेल्या डिलीटवर क्लिक करा. अशा प्रकारे ट्रॅश 'Empty होईल.
हे देखिल वाचा-
अशा डिलीट करा Android च्या डेटा फाइल्स आणि Cache
सर्वप्रथम स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा.
सेटिंगमध्ये स्टोरेजचा पर्याय निवडा.
त्यानंतर ज्या अॅप्सचे कॅशे तुम्हाला डिलीट करायचे आहेत ते अॅप निवडा.
अॅप सिलेक्ट केल्यावर Clear Cache या पर्यायावर क्लिक करा यामुळे केवळ कॅशे डिलीट होईल डेटा नाही.
जर तुम्हाला सर्व क्लियर करायचं असेल तर मात्र तुम्हाला Clear Data पर्यायावर क्लिक करावं लागेल.
मात्र यामुळे तुमची अॅप सेटिंग, फाईल्स सर्व डिलीट होईल.
अशा प्रकारे मात्र तुम्ही फोनमधील कॅशे आणि फाईल्स डिलीट केल्यास तुमचा मोबाईल पुन्हा सुपरफास्ट काम करू लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.