WhatsApp चे हे सिक्रेट फिचर्स तुम्हाला माहित आहेत का

गेल्या काही दिवसात WhatsApp ने अनेक नवे फिचर्स WhatsApp Features लॉन्च केले आहेत. सध्याच्या घडीला व्हाॅट्सअॅपचे स्टेटस Status हे फिचर सगळ्याच जास्त लोकप्रिय आहे
व्हाॅट्सअॅपचे सिक्रेट फिचर्स
व्हाॅट्सअॅपचे सिक्रेट फिचर्सEsakal
Updated on

मोबाईलमधील WhatsApp हे सध्याच्या घडीला लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं मेसेंजिंग ऍप Messaging App आहे. चॅट करण्यासोबतच, व्हिडीओ कॉल, ऑडिओ कॉल तसचं व्हाॅईस काॅल मेसेज आणि अगदी पेमेंट करण्यासाठी देखील व्हाॅट्सअपचा वापर केला जातो. Smart Tips Know the Secret Features of WhatsApp

गेल्या काही दिवसात WhatsApp ने अनेक नवे फिचर्स WhatsApp Features लॉन्च केले आहेत. सध्याच्या घडीला व्हाॅट्सअॅपचे स्टेटस Status हे फिचर सगळ्याच जास्त लोकप्रिय आहे.

व्हाॅट्सअॅप काळानुसार अपग्रेड होतंय. नवंनवे फिचर्स आणतंय. मात्र असे बरेच लोक आहेत ज्यांना व्हाट्सअपमधील विविध फिचर्सबद्दल कल्पनाच नसते. दररोज व्हाॅट्सअॅप वापरत असतानाही त्यांना WhatsAppच्या काही साध्या फिचर्सबद्दल माहिती नसते. अशांसाठीच आज आम्ही व्हाट्सअपच्या अशा काही ट्रिक आणि फिचर्सबद्दल सांगणार आहोत. जे अनेकांना कसे वापरावे हे ठाऊक नसेल.

ब्लू टीक- व्हाॅट्सअॅप सेंडरने पाठवलेला मेसेज रिसिव्हरने पाहिल्यानंतर सेंडरला दोन ब्लू टीक दिसतात. यावरून मेसेज पाठवणाऱ्याला आपण पाठवलेला मेसेज समोरील व्यक्तीने वाचला आहे हे लक्षात येत. अनेकदा मात्र काहींना लगेच रिप्लाय देण्यासाठी वेळ नसल्याने सेंडरला आपण मेसेज वाचला आहे हे कळू नये इच्छा असते. यासाठी तुम्ही ब्लू टीकचा पर्याय बंद करू शकता.

मेसेज वाचूनही त्याला उत्तर न दिल्याने कदाचित समोरची व्यक्ती नाराज होऊ शकते किंवा यामुळे गैरसमज वाढू शकतात. यासाठी ब्लू टीकचा पर्याय बंद करावा जेणे करून तुम्ही मेसेज वाचला आहे हे सेंडरला कळणारचं नाही.

यासाठी व्हाॅट्सअॅपच्या Setting मध्ये जाऊन Account पर्याय निवडा यात Privacy मध्ये read Receipents हा पर्याय बंद करा.

हे देखिल वाचा-

व्हाॅट्सअॅपचे सिक्रेट फिचर्स
WhatsApp Polls: व्हाॅटसअॅपवर असा घ्या पोल

प्रोफाईल फोटो करा हाईड- वाढत्या तंत्रज्ञानासोबत डेटा चोरी किंवा डेटाचा गैरवार होणं हा धोका देखील वाढत चालला आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना प्रायव्हसी राखणं गरजेचं आहे. तुमचा व्हाॅट्सअॅप प्रोफाईल फोटो कुणीही पाहू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तो फोटो हाईड करण्याचा किंवा फक्त काही मर्यादीत लोकांपुरता ठेवण्यासाठी व्हाट्सअपने पर्याय दिला आहे.

WhatsApp Profile Photo कुणालाही दिसू नये यासाठी Setting मध्ये जाऊन Account पर्याय निवडा यात Privacy मध्ये Profile Photo वर क्लिक करा. इथं जर तुम्ही Nobody पर्याय निवडल्यास तुमचा फोटो कुणीच पाहू शकणार नाही. तर Contacts हा पर्याय निवडल्यास तुम्ही ज्यांचे नंबर मोबाईलमध्ये सेव्ह केले आहेत ते तुमचा फोटो पाहू शकतील.

हे देखिल वाचा-

WhatsApp ग्रुप म्यूट करणं- आपण व्हाॅट्सअॅपवर विविध ग्रुपमध्ये जोडले गेलेलो असतो. मग ते कुटुंबियांचे, मित्र-मैत्रिणींचे असो किंवा ऑफिसचे. या ग्रुपवर अनेक लोक असल्याने सतत काही ना काही मेसेज आणि नोटीफिकेशनमुळे आपण हैराण होतो. खास करून सुट्टीच्या दिवशी किंवा कुठे व्हेकेशनला गेल्यावर. अशा वेळी तुम्ही ठराविक ग्रुप ठराविक काळासाठी म्यूट करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप म्यूट करण्यासाठी ग्रुपच्या नावावर क्लिक करा. त्यानंतर Info मध्ये जा. इथं तुम्हाला खाली Mute Notifications पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यास तुम्हाला ८ तासांसाठी किंवा १ आठवड्यासाठी किंवा कायमचा ग्रुप म्यूट करायचा आहे हे पर्याय मिळतील. योग्य पर्यायावर क्लिक करून OK केल्यास ग्रुप म्यूट होईल.

Last Seen करा बंद- व्हाट्सअपचा वापर तुम्ही कधी करताय हे तुमच्या लास्ट सीनवरून समोरच्या व्यक्तीला कळू शकतं. मात्र या पर्याय बंद करण्याची सोय देखील व्हाट्सअपने दिली आहे. यासाठी तुम्हाला प्रायव्हसी मेन्यूमध्ये जावं लागेल. इथं तुम्हाला Last Seen सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांसाठी लास्ट सीन बंद करायचं असल्यास Everyone वर क्लिक करा किंवा तुम्ही तुम्हाला हवे असलेले contacts निवडू शकता.

हे देखिल वाचा-

व्हाॅट्सअॅपचे सिक्रेट फिचर्स
WhatsApp Tricks : व्हॉट्सॲप वरील ही ट्रिक वापरा अन् फोटो चॅटमध्येच लपवा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()