Smart TV Tips : तुमचा स्मार्ट टीव्ही स्लो झालाय का? या टीप्स वापरा आणि झटक्यात टीव्ही फास्ट करा

आजकाल स्मार्ट टीव्ही घरोघरी पाहायला मिळतात इतके ते कॉमन झाले आहेत
Smart TV Tips
Smart TV Tipsesakal
Updated on

Smart TV Tips : आजकाल स्मार्ट टीव्ही घरोघरी पाहायला मिळतात इतके ते कॉमन झाले आहेत. 32 इंच असो किंवा 65 इंच, लोक स्मार्ट टीव्हीच खरेदी करतात. इंटरनेटशी कनेक्टड या डिव्हाईसमध्ये सर्व ऑप्शन एका क्लिकवर मिळतात. पण अनेक वेळा हा टीव्ही स्लो चालते. जर तुमचा टीव्ही देखील असाच स्लो चालत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा तीन टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा स्मार्ट टीव्ही झटक्यात फास्ट करु शकता.

फीचर डिसएबल करा

तुमच्या स्मार्ट टीव्हीमधील नको असलेले फीचर लगेचच डिसएबल करणे कधीही चांगले. मोशन एन्हांसमेंट किंवा एज एन्हांसमेंट यासारखे काही अतिरिक्त फीचर्स आहेत जे टीव्हीची स्पीड कमी करू शकतात. ते डिसएबल करण्यासाठी, तुम्हाला टीव्हीच्या सेटिंग्जवर जावे लागेल. मग मोशन एन्हांसर किंवा एज एन्हांसमेंट शोधावे लागेल. हे फीचर बंद करा. यामुळे तुमचा स्मार्ट टीव्ही फास्ट आणि स्मूथ चालेल.

Smart TV Tips
Health Care News: चुकूनही रात्री मोजे घालून झोपू नका, अन्यथा होऊ शकतात हे नुकसान

स्मार्ट टीव्ही सॉफ्टवेअर अपडेट करा

सॉफ्टवेअर अपडेट हा देखील टीव्ही फास्ट करण्याचा एक मार्ग आहे. अॅप्सचे कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी आणि दोष निराकरण करण्यासाठी अपडेट देत असतात. यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला होतो. तसेच टीव्ही फास्ट होतो. टीव्हीमध्ये सॉफ्टवेअर अपडेट तपासण्यासाठी तुम्हाला सेटिंग्ज मेनूवर जावे लागेल. त्यानंतर अपडेट तपासावे लागतील. जर काही अपडेट उपलब्ध असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा.

Smart TV Tips
Health Tips : पाणी पिताना ही चूक कराल तर आयुष्यातील पंधरा वर्ष होतील कमी!  

वायर्ड कनेक्शनवर स्विच करा

अनेक स्मार्ट टीव्ही इंटरनेटशी वायरलेस पद्धतीने कनेक्ट होतात. परंतु बरेच टीव्ही वायर्ड कनेक्शनसह येतात. वायर्ड कनेक्शन अधिक फास्ट आणि स्टेबल इंटरनेट कनेक्शन प्रदान करते. वायर्ड कनेक्शनवर स्विच करण्यासाठी तुम्हाला इथरनेट केबलद्वारे स्मार्ट टीव्ही लॅन पोर्ट कनेक्ट करणे आवश्यक आहे. नंतर इथरनेट केबल तुमच्या राउटरला किंवा मॉडेमच्या LAN पोर्टशी कनेक्ट करा. त्यानंतर टीव्ही सेटिंग्ज मेनूवर जा. त्यानंतर नेटवर्क किंवा इंटरनेट विभागात जा. नंतर वायर्ड कनेक्शन पर्यायावर स्विच करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.