Smartphone Battery Types : स्मार्टफोनच्या बॅटरीचे किती प्रकार आहेत?

फोनची बॅटरी लवकर उतरत असेल तर काय करावे?
Smartphone Battery Types
Smartphone Battery Typesesakal
Updated on

Smartphone Battery Tips : स्मार्टफोन वापरत असताना, तुमच्या फोनमध्ये बॅटरी कशी इन्स्टॉल होते याचा विचार तुम्ही केला आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की बॅटरीचे किती प्रकार आहेत आणि त्यांचे फायदे आणि तोटे काय आहेत.

नवीन स्मार्टफोन घेताना आपल्याला एक गोष्ट सतावते ती म्हणजे फोनची बॅटरी. स्मार्टफोनमध्ये बॅटरी चांगली नसेल तर फोन वापरण्यात मजा येत नाही. फोन पूर्ण चार्ज झाल्यावर फोनची बॅटरी किमान एक दिवस चालली पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची बातमी तुम्ही अनेकदा ऐकली असेल. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत पण त्यामध्ये बॅटरी कॉमन आहे. (Smartphone Battery Tips : types of smartphone batteries merits demerits explained )

Smartphone Battery Types
Smartphone Tips : कामासाठी सतत वापरावा लागतोय मोबाईल? डोळ्यांचं नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स

अशा स्थितीत फोनची कोणती बॅटरी योग्य आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. फोनच्या बॅटरीचे विविध प्रकार कोणते आहेत आणि त्यांचे फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घेऊया.

स्मार्टफोनच्या बॅटरीचे किती प्रकार आहेत?

फोनमध्ये दोन प्रकारच्या बॅटरी असतात. लिथियम आयन आणि लिथियम पॉलिमर. या दोन्ही बॅटरीची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्यांचे काही तोटे आहेत का?या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या

लिथियम आयन बॅटरी:

बहुतेक फोनमध्ये हीच बॅटरी वापरले जाते. ज्या फोनमध्ये ही बॅटरी वापरली जाते, ते स्मार्टफोन भारी असतात. हाय पॉवर कपॅसिटी असलेली ही बॅटरी शेकडो वेळा चार्ज केली जाऊ शकते. पण त्याचाही तोटा आहे. फोनच्या बॅटरीवर जास्त भार टाकला गेला किंवा ती नीट वापरली गेली नाही किंवा ती जास्त चार्ज झाली तर त्यामुळेही बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

Smartphone Battery Types
Smartphone Hacks : मोबाईल सेफ ठेवायचा असेल तर हे Apps आत्ताच डिलिट करा!

लिथियम पॉलिमर बॅटरी:

ज्या प्रकारचे फोन सुधारले गेले आहेत. त्याचप्रमाणे बॅटरीमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. लिथियम पॉलिमर बॅटरीला अपग्रेड म्हटले जाऊ शकते. ही बॅटरी अनेक फोनमध्ये दिली जाते. ज्या फोनमध्ये ही बॅटरी दिली आहे ते वजनाने हलके आहेत. यात लिथियम आयन बॅटरीसारखे बरेच दोष नाहीत पण या बॅटरी फारशा टिकाऊ नसतात. त्यांचा बॅटरी बॅकअप फारसा दिसला नाही.(Smartphone)

Smartphone Battery Types
Samsung Smartphone Discount : सॅमसंगचा मोबाईल घ्यायचाय? अमेझॉनवर मिळतेय बंपर ऑफर! जाणून घ्या

फोनची बॅटरी लवकर उतरत असेल तर काय करावे?

रिफ्रेश रेट कमी ठेवा

जसं एखाद्या सिग्नलवर गाडी बंद न करता उभे असतात. कारण, गाडी बंद करून पुन्हा चालू करायला जास्त पेट्रोल जातं. तसं आपल्या फोनचंही आहे. फोनची बॅटरी लवकर समाप्त होण्याचे कारण डिव्हाइसचा जास्त वेळ वापर करणे हे देखील आहे. (Smartphone Battery)

रिफ्रेश रेट जेवढा जास्त असेल, तेवढ्या लवकर फोनची बॅटरी समाप्त होईल. फोनच्या सेटिंग्समध्ये दिलेल्या रिफ्रेश रेटला तुमच्या सोयीनुसार ६० हर्ट्ज आणि ९० हर्ट्जवर सेट केल्यास फोनची बॅटरी लवकर समाप्त होणार नाही.

फोनमधील ऍप्सi7 b8i

फोनची बॅटरी लाइफ वाढवण्याची आणखी एक सोपी पद्धत आहे. यासाठी फोनमधील कोणते अ‍ॅप्स सर्वाधिक बॅटरीचा वापर करतात, ते पाहा. तुम्हाला फोनच्या सेटिंग्समध्ये गेल्यावर बॅटरी सेक्शनमध्ये याची माहिती मिळेल.

येथे कोणते अ‍ॅप्स सर्वाधिक बॅटरीचा वापर करतात, त्याची लिस्ट दिसेल. तुम्ही सर्वाधिक बॅटरी वापरणाऱ्या अ‍ॅप्सला इंस्टॉल करू शकता. ज्यामुळे फोनची बॅटरी लाइफ वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.