Smartphone : जुना फोन देऊन ३०० रुपयांत खरेदी करा 5G Smartphone

तुम्ही स्वतःसाठी एक स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
5G Smartphone
5G Smartphonegoogle
Updated on

मुंबई : Flipkart बिग बिलियन डेज सेल ६ ऑगस्ट 2022 पासून Flipkart वर सुरू झाला आहे, ज्यामध्ये कपड्यांपासून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपर्यंत सर्व उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही Oppo चे ग्राहक असाल आणि तुम्ही स्वतःसाठी एक स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सेल दरम्यान, तुम्ही OPPO K10 5G फक्त 249 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

5G Smartphone
Fraud : स्मार्टफोनमध्ये Truecaller असेल तर सावध व्हा; बँक खाते होईल रिकामी

स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करा

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की Oppo OPPO K10 5G स्मार्टफोनचा 8 GB रॅम ₹ 25,999 ऐवजी ₹ 17,499 मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. स्मार्टफोनवर ₹8500 पर्यंत सूट मिळत आहे. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड खरेदी करताना वापरत असाल तर तुम्हाला 500 रुपयांची सूट मिळेल. याशिवाय तुम्ही येस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला ₹ 2000 ची झटपट सूट मिळेल.

इतकेच नाही तर BOB बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1500 पर्यंत सूट मिळणार आहे. यामध्ये एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. फोनवर ₹16,750 पर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पुरेपूर फायदा मिळाल्यास, तुम्ही अतिशय स्वस्त दरात खरेदी करू शकाल.

5G Smartphone
८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हा स्मार्टफोन ; 512GB स्टोरेज

Oppo K10 5G तपशील

K10 5G 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाच्या HD+ डिस्प्लेसह येतो. K10 5G स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 810 चिप वापरली गेली आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो. तथापि, मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते.

Oppo K10 5G स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 48-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ-सेन्सिंग कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन Android 12-आधारित ColorOS 12.1 वर चालतो. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.