Smartphone Tips: फुल ब्राइटनेसमुळे खराब होऊ शकतो तुमचा फोन, नुकसानीपासून वाचण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

फोनची ब्राइटनेस जास्त ठेवल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतो. यामुळे हँडसेटच्या बॅटरी लाइफवर परिणाम होतो.
Phone
PhoneSakal
Updated on

Smartphone Brightness Issue: अनेकजण स्मार्टफोन वापरताना ब्राइटनेस नेहमी जास्त ठेवतात. यामुळे व्हिजिबिलिटी चांगली मिळते व व्हीडिओ पाहताना, गेम खेळताना देखील आनंद मिळतो. तुम्ही जर ऑनलाइन काही वाचत असाल तर अशावेळी ब्राइटनेस जास्त असल्यास नक्कीच फायदा होतो. परंतु, जास्त ब्राइटनेस ठेवल्यामुळे नुकसान देखील होऊ शकते. यामुळे तुमचा फोन खराब होण्याची शक्यता आहे. ब्राइटनेस जास्त ठेवल्यामुळे कोणती समस्या निर्माण होऊ शकते, याविषयी जाणून घेऊया.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

बॅटरी होईल खराब

फुल ब्राइटनेस ठेवून स्मार्टफोन वापरल्यास बॅटरी लाइफ कमी होईल. ब्राइटनेस जास्त असल्यामुळे बॅटरी लवकर संपते. ब्राइटनेसमुळे बॅटरी लाइफवर परिणाम होतो. याशिवाय, ब्राइटनेस फुल ठेवल्यास अनेकदा स्मार्टफोन हँग होण्याची देखील शक्यता आहे. कारण, यामुळे प्रोसेसरवरील दबाब वाढतो.

डिस्प्ले होऊ शकतो खराब

नियमितपणे ब्राइटनेस जास्त ठेवल्यास तुमच्या स्मार्टफोनचा डिस्प्ले देखील खराब होऊ शकतो. जास्त ब्राइटनेसमुळे डिस्प्लेचे नुकसान होते व तुम्हाला फोन वापरता येणार नाही. अशा स्थितीत नवीन डिस्प्लेसाठी तुमच्या खिशावर भार पडेल.

Phone
Upcoming Bike: नवीन बाईक घ्यायचीये? थोडी वाट पाहा; २०२३ मध्ये Royal Enfield च्या ५ स्वस्त दुचाकींंची होणार एंट्री

वारंवार फोन करावा लागेल चार्ज

फूल ब्राइटनेसमुळे बॅटरी लाइफ कमी होण्याची तर शक्यता असतेच. मात्र यामुळे तुम्हाला वारंवार फोन चार्ज करावा लागू शकतो. गेम खेळताना अथवा व्हीडिओ पाहताना ब्राइटनेस जास्त असल्यास नेहमीच्या तुलनेत बॅटरी लवकर संपेल. अशा स्थितीत अवघ्या काही तासांमध्ये तुम्हाला फोन पुन्हा चार्ज करावा लागेल.

बॅटरी ओव्हरहीटिंग

बॅटरी ओव्हरहीटिंगबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. अनेकदा फोन अचानक गरम होतो. ही समस्या फोन जास्त वापरल्यामुळे, बॅटरी खराब असल्यामुळे आणि ब्राइटनेस फुल ठेवल्यामुळे निर्माण होते. या समस्यांपासून सुटका हवी असल्यास ब्राइटनेसला मीडियमवर सेट करू शकता. तुम्ही फोनच्या ब्राइटनेसला ऑटोवर देखील सेट करू शकता. यामुळे गरजेनुसार ब्राइटनेस आपोआप कमी जास्त होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.