Smartphone Tips : कामासाठी सतत वापरावा लागतोय मोबाईल? डोळ्यांचं नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स

स्मार्टफोनमधून येणारी ब्लू लाईट ही आपल्या डोळ्यांसाठी धोकादायक असते.
Smartphone Tips for Eyes
Smartphone Tips for EyesEsakal
Updated on

स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलच्या अति वापराचे धोके आता जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. तरीही दैनंदिन जीवनात गरज म्हणून मोबाईलचा वापर होतोच. मात्र, यासोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणंही गरजेचं आहे. त्यामुळेच, मोबाईल कसा वापरायचा याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

मोबाईलचे दुष्परिणाम

स्मार्टफोनमधून येणारी ब्लू लाईट (Mobile Blue Light) ही आपल्या डोळ्यातील रेटिनासाठी धोकादायक असते. डोळ्यातील कॉर्निया आणि लेन्स या ब्लू-लाईटला सहन करू शकत नाहीत. त्यामुळे मोबाईलच्या अति वापराचा मोठा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो.

Smartphone Tips for Eyes
Gaming Officer : केवळ मोबाईल गेम खेळून मिळवा १० लाख रुपये! 'या' कंपनीने दिली बंपर ऑफर

डोळ्यांचा थकवा, डोळ्यांमधील खाज आणि कोरडेपणा, दृष्टी कमकुवत होणं यांसारखे कित्येक दुष्परिणाम यामुळे होतात. हे सर्व आजार दीर्घकालीन ठरू शकतात, त्यामुळे वेळीच खबरदारी घेणं गरजेचं आहे.

चेहऱ्यापासून ठेवा दूर

स्मार्टफोन वापरताना कित्येक लोक तो चेहऱ्याच्या अगदी जवळ ठेवतात. त्यामुळे आपल्या डोळ्यांना भरपूर प्रमाणात इजा होऊ शकते. त्यामुळे मोबाईल वापरताना तो नेहमी डोळ्यांपासून 16 ते 18 इंच दूर (Smartphone using tips) असावा.

ब्राईटनेस करा सेट

मोबाईलची ब्राईटनेस जेवढी जास्त असेल, तेवढा अधिक परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. त्यामुळे गरज नसताना भरपूर ब्राईटनेस वाढवून ठेऊ नका. आजूबाजूच्या लाईटनुसार ब्राईटनेस अ‍ॅडजस्ट करत रहा.

Smartphone Tips for Eyes
Mobile Laptop च्या अतिवापराने वाढतोय Tech Neckचा धोका, होऊ शकतात गंभीर परिणाम

अंधारात वापर टाळा

बऱ्याच लोकांना झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्याची सवय असते. अशा वेळी अंधारात हे लोक मोबाईल (Smartphone brightness tips) वापरतात. मात्र, हीच गोष्ट डोळ्यांसाठी अधिक धोक्याची ठरते. अंधारात मोबाईल वापरण्याची अगदीच गरज असेल, तर त्यानुसार स्क्रीन ब्राईटनेस शक्य तितकी कमी करावी.

20-20-20

मोबाईल वापरण्यासंबंधी 20-20-20 हा नियम (Mobile 20-20-20 tip) भरपूर प्रसिद्ध आहे. मोबाईल वापरत असताना 20 मिनिटं झाल्यानंतर 20 सेकंदांसाठी तुमचा फोन बाजूला ठेऊन 20 फूट दूर असलेल्या एखाद्या वस्तूकडे पाहा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो.

सोपा उपाय

याव्यतिरिक्त आणखी एक सोपा उपाय म्हणजे, वेळोवेळी पापण्या फडकावत राहणं. मोबाईल वापरत असताना थोड्या-थोड्या वेळाने पापण्या फडकावल्याने डोळ्यांमध्ये आद्रता टिकून राहते. यामुळे डोळ्यात कोरडेपणा किंवा खाज अशा समस्या होत नाहीत. १५ मिनिटांच्या वेळेत कमीत कमी १० वेळा पापण्या फडकावणं योग्य मानतात.

Smartphone Tips for Eyes
Mobile Phone Use : मित्रांनो तुम्हीही एवढ्या मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल बघता? जडतील गंभीर आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.