108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले स्मार्टफोन, किंमत 20 हजारांहून कमी

Moto G60
Moto G60
Updated on

108 MP Camera Phone : जर तुम्ही नवीन वर्षात नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण Flipkart आणि Amazon India वर उपलब्ध असलेल्या काही निवडक 108 मेगापिक्सेल कॅमेरा स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला या डिव्हाईसवर सूट, कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज सारख्या आकर्षक ऑफर देखील मिळतील.

Moto G60

Moto G60 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.8-इंचाची स्क्रीन दिली आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. यात स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसर दिला आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 6 GB रॅम, 128 GB इंटरनल स्टोरेज आणि 108 मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. 108-मेगापिक्सेल सेन्सर व्यतिरिक्त, यात 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आहे. तर व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल. इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, Moto G60 5G स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, GPS, ब्लूटूथ, USB टाइप-सी पोर्ट सारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्ससह 6000 mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. किंमत:- 17,999 रुपये

Moto G60
Oppo, Xiaomi कंपन्या अडचणीत; लागू शकतो तब्बल 1,000 कोटींचा दंड

Realme 8 Pro

रिअलमी 8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असून जे मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सेल क्वाड रियर कॅमेरा सेटअप, 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सोबत 4500 mAh बॅटरी मिळेल. तसेच, क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर देण्यात आले आहे. किंमत - 19,999 रुपये

Redmi Note 10 Pro Max

Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन 108-मेगापिक्सेल प्रायमरी लेन्स, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2-मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स आणि 5-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. याशिवाय, यात स्नॅपड्रॅगन 732G ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 5020 mAh बॅटरी मिळेल, जी 33 W फास्ट चार्जरसह येते. याशिवाय फोनमध्ये 6.67 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. किंमत - 19,999 रुपये

Moto G60
कोरोनाचा फटका, डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर ४ महिन्यांच्या उच्चांकावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.