Social Media: बिनधास्त सोशल मीडिया वापरतायं? 'ही' चूक केल्यास भरावा लागेल ५० लाखांचा दंड

फेसबुक, इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म्स कमाईचे देखील माध्यम झाले आहेत. मात्र, आता सोशल मीडियावर प्रमोशनल पोस्ट टाकताना काळजी घ्यावी लागणार आहे.
Social Media
Social MediaSakal
Updated on

Guidelines for social media influencers: सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म्स कमाईचे देखील माध्यम झाले आहेत. मात्र, आता सोशल मीडियावर प्रमोशनल पोस्ट टाकताना काळजी घ्यावी लागणार आहे. जे सोशल मीडिया इनफ्लुएन्‍सर आपल्या फॉलोअर्सला पेड प्रमोशन्सबाबत माहिती देणार नाहीत, त्यांना ५० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. सरकार यासाठी नियमावली आणण्याची शक्यता आहे.

सोशल मीडिया इनफ्लुएन्‍सर (Social media influencers) अनेकदा विशिष्ट ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सला प्रमोट करतात. मात्र, आता आशा प्रोडक्ट्सची जाहिरात करताना फॉलोअर्सला त्याबाबत माहिती द्यावी लागणार आहे. रिपोर्टनुसार, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयद्वारे यासाठी नियमावली जारी केली जाईल. या अंतर्गत एखाद्या वस्तूची जाहिरात करताना त्याबाबत यूजर्सला माहिती द्यावी लागेल.

Social Media
Best Cars: तरुणांमध्ये 'या' गाड्यांची क्रेझ, स्पोर्टी लूक अन् शानदार फीचर्स; किंमत ८ लाखांपासून सुरू

जर इनफ्लुएन्‍सरने याबाबत माहिती न दिल्यास यूजर्स केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे (CCPA) तक्रार करू शकतात. दोषी आढळल्यास इनफ्लुएन्‍सरला ५० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठवला जाऊ शकतो.

अनेकदा सोशल मीडिया इनफ्लुएन्सर पोस्ट व व्हीडिओच्या माध्यमातून कोणत्याही वस्तूंचे प्रमोशन करत असतात. याद्वारे ते अप्रत्यक्षपणे यूजर्सला ती वस्तू वापरण्यासाठी प्रोत्साहित करतात. मात्र, या प्रोडक्ट्सच्या परिणामाबाबत इनफ्लुएन्सरला काहीही माहिती नसते. यावर अकुंश आणण्यासाठी सरकारकडे सध्या कोणतीही नियमावली नाही. मात्र, आता सरकारकडून अशाप्रकारच्या गोष्टींवर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे नवीन नियम सोशल मीडिया इनफ्लुएन्सरसोबतच सेलिब्रिटी आणि फाइनेशिंयल इनफ्लुएन्सरला देखील लागू असतील.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

तसेच, इनफ्लुएन्सरला कंपनीकडे मोफत मिळणाऱ्या वस्तू जसे की कार, मोबाइल, कॉस्मेटिक्स आणि कपड्यांवर टीडीएस भरावा लागतो. मात्र, या वस्तू पुन्हा कंपन्यांना परत केल्यास कोणताही कर द्यावा लागत नाही.

हेही वाचा: Smartphone Tips: स्मार्टफोन ऐकतोय तुमच्या बेडरुममधील गप्पा? सेटिंगमध्ये त्वरित करा बदल, अन्यथा पडेल महागात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.